'हे' तीन शक्तिशाली देश आले इराणच्या मदतीला धावून; अमेरिकेला हल्ला न करण्याचे चार फायदे सांगितले समजावून ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Saudi Arabia Oman Qatar support for Iran 2026 : इराणमध्ये (Iran) सुरू असलेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी “मदत पोहोचवली जाईल” असे म्हणत लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या या ‘वार प्लॅन’ला अमेरिकेच्याच जवळच्या मित्रांकडून कडवा विरोध होताना दिसत आहे. सौदी अरेबिया, कतार आणि ओमान या तीन महत्त्वाच्या आखाती राष्ट्रांनी इराणच्या बाजूने ‘बॅकडोअर’ मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या देशांच्या मते, इराणवर केलेला कोणताही हल्ला हा अमेरिकेसाठी ‘बूमरँग’ ठरू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही देशांचे प्रतिनिधी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन प्रशासनाला युद्धाचे तोटे समजावून सांगत आहेत. कतारच्या पंतप्रधानांनी थेट इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांच्याशी संवाद साधून तणाव कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सौदी अरेबियाने तर स्पष्ट केले आहे की, जर अमेरिका इराणवर हल्ला करण्याची योजना आखत असेल, तर सौदी आपले हवाई क्षेत्र वापरू देणार नाही आणि या युद्धात कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Video Viral: फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव
१. मध्यपूर्वेत अराजकता (Chaos in Middle East): कतारच्या मते, इराणवर हल्ला झाल्यास संपूर्ण मध्यपूर्व प्रदेशात दहशतीचे वातावरण निर्माण होईल. हे केवळ इराणपुरते मर्यादित न राहता शेजारील सौदी, युएई आणि कतारच्या स्थिरतेलाही धोका निर्माण करेल.
२. जागतिक तेल संकट (Global Oil Crisis): ओमानने अमेरिकेचे लक्ष ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’कडे वेधले आहे. जगातील २५% कच्च्या तेलाचा आणि २०% नैसर्गिक वायूचा व्यापार याच चिंचोळ्या मार्गातून होतो. जर इराणने हा मार्ग बंद केला, तर तेलाचे दर गगनाला भिडतील, ज्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते.
Arab Gulf states led by #SaudiArabia 🇸🇦 are urging the #Trump administration not to strike #Iran 🇮🇷, warning such action could disrupt oil markets and harm the U.S. economy, the Wall Street Journal reported. Saudi Arabia, Oman, and Qatar have also told Iran they would not join… pic.twitter.com/dJvbHh53FM — 🎙The Milli Chronicle (@MilliChronicle) January 13, 2026
credit : social media and Twitter
३. सत्तेचे चुकीचे हस्तांतरण: सौदीला भीती आहे की, जर खामेनी यांची सत्ता बळाने पाडली गेली, तर तिथली सूत्रे ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड’ (IRGC) सारख्या कट्टरपंथी गटांच्या हातात जातील. हे सौदी अरेबियाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक ठरेल.
४. सौदीची प्रतिमा आणि ‘न्यूट्रल’ भूमिका: सौदी अरेबियाला आता इराणशी जुने वाद उकरून काढायचे नाहीत. जर त्यांनी अमेरिकेला मदत केली, तर मुस्लिम जगात त्यांची प्रतिमा मलिन होईल. म्हणूनच सौदीने आपल्या माध्यमांनाही इराणबद्दल नकारात्मक बातम्या न देण्याचे आदेश दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Arctic Warfare: ‘आम्ही आमचे निर्णय स्वतः…’, PM Nielsen यांची नूक मधून गर्जना; ट्रम्पच्या ‘रियल इस्टेट’ डीलला Greenlandचा ठेंगा
इराणसाठी ही बाब मोठा दिलासा देणारी आहे, कारण कतारच्या ‘अल उदेद’ तळावर अमेरिकेचे ५०,००० सैनिक तैनात आहेत. जर या देशांनी सहकार्य नाकारले, तर अमेरिकेला इराणवर मोठा हल्ला करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होईल. सौदीतील माजी अमेरिकन राजदूत मायकेल रॅटनी यांच्या मते, “सौदीला इराण आवडत नसला तरी, त्यांना विनाशकारी युद्ध नको आहे, कारण त्यासाठी ते सध्या तयार नाहीत.”
Ans: सौदीला भीती आहे की इराणमधील युद्धामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता येईल आणि तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल.
Ans: जगातील एकूण सागरी तेल व्यापारापैकी सुमारे २५% व्यापार याच मार्गातून होतो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक ऊर्जा संकट निर्माण होईल.
Ans: कतार हे अमेरिका आणि इराणमधील महत्त्वाचे मध्यस्थ आहे. कतारला युद्धाऐवजी चर्चेद्वारे तोडगा हवा आहे जेणेकरून प्रादेशिक शांतता भंग पावणार नाही.






