
Mohan Bhagwat Don't respect RSS leaders! US advisory commission's controversial statement Indian Foreign Ministry aggressive
भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे लवकरच अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्क शहरात ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) द्वारे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स’ (Universal Oneness Celebrations) मध्ये ते भारतीय समुदायाला आणि हिंदू अमेरिकनांना संबोधित करणार आहेत. मात्र, या नियोजित दौऱ्याच्या अवघ्या काही दिवस आधी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याबाबत सल्ला देणाऱ्या ‘USCIRF’ (United States Commission on International Religious Freedom) या मध्यवर्ती सल्लागार संस्थेने नवीन वाद उभा केला आहे.
USCIRF च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकन सरकारला आणि ट्रम्प प्रशासनाला पत्र लिहून तसेच आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावरून मागणी केली आहे की, अमेरिकेने आरएसएस नेत्यांना कोणताही राजनैतिक सन्मान किंवा उच्चस्तरीय भेटींची संधी देऊ नये. त्याऐवजी, धार्मिक स्वातंत्र्याचे कथित उल्लंघन केल्याबद्दल आरएसएसच्या सदस्यांवर थेट ‘लक्ष्यित निर्बंध’ (Targeted Sanctions) लादण्यात यावेत, असा आग्रह या संस्थेने धरला आहे.
USCIRF चे अध्यक्ष आसिफ महमूद (Asif Mahmood) यांनी सोशल मीडियावर आपले वक्तव्य शेअर करताना म्हटले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. आरएसएस ही एक व्यापक छत्री संघटना (Umbrella Organisation) आहे, ज्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या काही संलग्न संघटनांवर धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले केल्याचे आरोप आहेत. आता या संघरचनेचे प्रमुख मोहन भागवत अमेरिकेचा दौरा करत आहेत.“
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेन युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का; 14.7 लाखांहून अधिक सैनिकांसह लष्करी साधनसामग्रीचा महाविनाश
त्याच वेळी, USCIRF चे आयुक्त जीन मिल्स (Gene Mills) यांनी पुढे जात अमेरिकन प्रशासनाला सल्ला दिला आहे की, “आरएसएसचे नेते भारतीय सरकारशी कोणत्याही प्रकारे जोडलेले असले, तरीही अमेरिकेत त्यांचे स्वागत राजनैतिक सौजन्याने किंवा उच्चस्तरीय बैठका देऊन करू नये. अमेरिकन सरकारने धार्मिक स्वातंत्र्याविरुद्ध काम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि निर्बंध लादण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.“
Chair @DrMahmood40: “India’s PM Modi is a member of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), an Indian umbrella organization whose sub-groups have perpetrated attacks on religious minorities, incl. Christians & Muslims. Now the RSS leader, Mohan Bhagwat, plans to visit the U.S.” — USCIRF (@USCIRF) August 19, 2026
credit – social media and Twitter
USCIRF च्या या भूमिकेवर आणि वार्षिक अहवालावर भारत सरकारने पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, “USCIRF ही संस्था सातत्याने भारताची एक ‘विकृत, पूर्वग्रहदूषित आणि निवडक’ (Distorted and Selective) प्रतिमा जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यांचे अहवाल संशयास्पद स्त्रोत आणि विशिष्ट वैचारिक अजेंड्यावर आधारित असतात.“
परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला आरसा दाखवत पुढे म्हटले की, “भारतावर बोट दाखवण्याऐवजी USCIRF ने अमेरिकेतच हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले, मंदिरांची तोडफोड, भारतीय वंशाच्या लोकांविरोधात वाढणारी द्वेषपूर्ण गुन्हेगारी (Hate Crimes) आणि वाढती असहिष्णुता यावर लक्ष केंद्रित करून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.” विशेष म्हणजे, USCIRF ही अमेरिकन सरकारची केवळ एक सल्लागार संस्था (Advisory Body) आहे. तिच्या शिफारसी किंवा सूचना मानणे हे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयावर किंवा व्हाईट हाऊसवर (US Government) कायदेशीररीत्या बंधनकारक नसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Syria Airstrikes: इस्रायलचे सीरियाच्या ‘Abu al Duhur’ हवाई तळावर 8 भीषण हल्ले; अमेरिकेचा थेट आक्षेप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यंदा आपले १०० वे स्थापना वर्ष (Centenary Year) साजरे करत आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडमचा (UK) तीन देशांचा प्रदीर्घ दौरा करत आहेत. न्यू यॉर्कमधील २९ ऑगस्टच्या कार्यक्रमात ते जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, तरुण आणि स्थानिक संघटनांशी ‘सामाजिक समरसता, जागतिक शांतता आणि बंधुभाव’ या विषयांवर संवाद साधणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही संस्थांकडून वारंवार केला जात असला, तरी अमेरिकेतील भारतीय समुदाय (Indian Diaspora) आणि विविध संघटना मोहन भागवत यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.