
victoria australia bushfire crisis missing persons 46 degrees heatwave 2026
Australia Bushfire Crisis 2026: ऑस्ट्रेलियातील (Australia) व्हिक्टोरिया राज्य सध्या एका महाभयानक नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. २०१९-२० च्या ‘ब्लॅक समर’ नंतर प्रथमच या प्रदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आगीचे तांडव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (९ जानेवारी २०२६) व्हिक्टोरियामधील अनेक भागांत तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जंगलातील आगीने (Bushfires) नियंत्रण गमावले आहे. या भीषण आगीत रफि आणि लाँगवूड यांसारखी गावे अक्षरशः वेढली गेली असून अनेक घरे जळून खाक झाली आहेत.
व्हिक्टोरिया पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य व्हिक्टोरियातील लाँगवूड ईस्ट (Longwood East) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एक घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, त्यातील दोन प्रौढ आणि एक लहान मूल अद्याप बेपत्ता आहेत. गुरुवारी अग्निशमन दलाने त्यांना तातडीने घर सोडण्याचा सल्ला दिला होता, परंतु आग इतक्या वेगाने पसरली की त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. उपायुक्त बॉब हिल यांनी सांगितले की, “त्यांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्यास सांगितले होते, मात्र सध्या त्यांचा कोणताही थांगपत्ता लागत नाहीये.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO
संपूर्ण राज्यामध्ये सध्या ३० हून अधिक ठिकाणी आगी धुमसत आहेत. उत्तरेकडील व्हिक्टोरियामध्ये पारा ४६ अंशांवर पोहोचला असून, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे आगीची दिशा वारंवार बदलत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, दुपारी ‘कोरडी वीज’ (Dry Lightning) पडण्याची शक्यता आहे. पाऊस न पडता केवळ वीज पडल्यामुळे जंगलात नवीन ठिकाणी आग लागण्याची भीती आहे. याशिवाय ११० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आगीचा प्रसार मानवी वस्त्यांकडे वेगाने होत आहे.
🔥 Three people are missing amid an ongoing #bushfire crisis in the southeast Australian state of #Victoria, according to local authorities. Southern #Australia has been experiencing a #heatwave since Wednesday, with temperatures exceeding 40℃ in many areas. Victoria and South… pic.twitter.com/lbH1mQ7hL9 — CCTV Asia Pacific (@CCTVAsiaPacific) January 9, 2026
credit : social media and Twitter
व्हिक्टोरियाच्या पंतप्रधान जॅसिंटा ॲलन यांनी राज्यातील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “आजचा दिवस या दशकातील सर्वात धोकादायक दिवस आहे. ४ भागांमध्ये ‘कॅटास्ट्रोफिक’ (अत्यंत विनाशकारी) इशारा जारी करण्यात आला आहे. जर तुम्हाला घर सोडण्याचा आदेश दिला असेल, तर कृपया वेळ वाया घालवू नका. तुमचे घर वाचवण्यासाठी तिथे थांबणे जीवावर बेतू शकते.” सुमारे ९०,००० हून अधिक घरांची वीज खंडित झाली असून, मुख्य महामार्गही बंद करण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई
२०१९-२० च्या भीषण आगीत ऑस्ट्रेलियाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी आणीबाणी मानली जात आहे. ‘रफी’ शहरातील एका शाळेसह अनेक मालमत्ता नष्ट झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान रक्ताचे पाणी करून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु हवामानाची साथ मिळत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.