
VIDEO Plane carrying Congo ministers, 20 others bursts into flames
काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अंगोलाचे चार्टर्ड एम्ब्रेअर ERJ-145 होते. हे विमान काँगोच्या खाण मंत्री लुई वाटुम कांबाबा आणि त्यांच्या २० सदस्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन निघाले होते. यावेळी विमान लँडिंग करतना अचनाक कोसळले आणि भीषण आग लागली. सुदैवाने खाण मंत्री आणि इतर २० सदस्य तसेच क्रू मेंमबर्स आग पसरण्यापूर्वीच सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडले. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मीडिया रिपोर्टनुसार हे चार्टर्ड विमान काँगोचे मंत्री लुई वाटेम कांबाबा यांना घेऊ लुआलाबाला गेले होते. यावेळी कोल्वेझी विमानतळावर लँडिगवेळी हा अपघात झाला. या अपघाताच्या काही तासांपूर्वी काँगोच्या खाणीत पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला होता. याची पाहणी करण्यासाठी मंत्री लुई वाटेम कांबाबा आणि इतर शिष्टमंडळ आले होते. पण लँडिंग दरम्यान गियर तुटला अन् विमान धावपट्टीवरुन घसरले.
सध्या या घटनेची स्वंतत्र चौकशी सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पंरतु विमानचा मधला भाग पूर्णत: जळाला. या घटनेनंतर खाण मंत्रालयाची एक बैठक झाली. या बैठकीत कलांडो येथील खाणीत झालेल्या पूल अपघातावर चर्चा झाली. यावेळी अपघातात बळी पडलेल्यांना मदत करण्याच्या उपाययोजनांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांच्या चर्चा सुरु आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, विमान खाली उतरताना दिसत आहे. पण काही सेकंदानंतर ते अचानक कोसळते आणि त्याच्या मागील भागात पेट घेते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की मंत्री विमानातून जीव वाचवून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, आगीच्या ज्वाळा आणि धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव
Ans: काँगोत कोल्वेझी विमानतळावर एम्ब्रेअर ERJ-145 या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
Ans: काँगो विमान अपघाता सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु विमानाचा मधला भाग पूर्ण जळून खाक झाला आहे.
Ans: अंगोलाचे चार्टर्ड एम्ब्रेअर ERJ-145 काँगोचे खाण मंत्री लुई वाटुम कांबाबा आणि त्यांच्या २० सदस्यांच्या शिष्टमंडळाला कोल्वेझी निघाले होते.