
India continues to buy Russian oil despite pressure from US and Europe
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतररष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहे. मात्र या दरम्यान अमेरिका आणि नाटो देश रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दबाव आणत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नाटोचे चीफने भारत, ब्राझील, आणि चीनला रशियाकडून तेल व गॅस खरेदी थांबवण्याची धमकी दिली होती, अन्याथा या देशांवर १००% टॅरिफ लादले जाईल असे म्हटले जात होते.
दरम्यान भारताने या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर पाश्चात्य देशांच्या टीकेला विरोध केला आहे. ब्रिटनच्या टाईम्स रेडिओ मुलाखती दरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.
विक्रम दोराईस्वामी यांनी पाश्चात्त्य देशांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “अनेक युरोपीय देश भारत खरेदी करत असलेल्या स्त्रोतांकडून उर्जा व दुर्मिळ खनिज पदार्थ खरेदी करत आहेत. आणि हेच देश भारताला त्या स्त्रोतांपासून खरेदी न करण्याचा सल्ला देतात. हे अयोग्य नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
भारत हा तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. पूर्वी भारत मध्य पूर्वेतून बहुतेक तेल खरेदी करत होता, परंतु २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आणि पाश्चात्य निर्बंधामुळे रशियाने पर्यायी तेल खरेदीदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. या संधीचा फायदा भारताने घेतला. भारत सध्या ८०% पेक्षा जास्त तेल खरेदी करत आहे.
भारत आणि रशिया संबंधांवर बोलताना देराईस्वामी यांनी दोन्ही देशांच्या संबंध केवळ एका नेत्यावर आधारित नसून दीर्घकारीन सुरक्षा सहकार्यवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एक उदाहरण देत सांगतिले की, पाश्चत्य देशांनी भारताला शस्त्रे विकण्यास नकार दिला होता, त्यावेळी रशियाने भारताला मदत केली होती. पण असे असले तरी, ज्याप्रमाणे इतर देश राष्ट्रीय हिताचा विचार करुन संबंध प्रस्थापित करतात, तसेच भारत देखील त्यांच्या उर्जा आणि धोरणात्मक हित संबंधांना लक्षात घेऊन निर्णय घेतो. याचदरम्यान युक्रेन युद्धावर त्यांनी जागतिक देशांप्रमाणेच भारताला देखील या युद्धावर शांततेच्या मार्गाने तोडगा हवा असल्याचे म्हटले आहे.