
Violent clashes between Yunus-Hasina supporters in Bangladesh; 4 dead, 9 injured
ढाका : सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोघांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. गोपालगंजमध्ये युनूस समर्थक नेशनल सिटिझन्स पार्टी (एनसीपी) आणि शेख हसीना लीगच्या पक्षाशी संबंधीत लोकांमध्ये झटापट झाली आहे. यामध्ये ४ जणांचा मृत्यू, तर ९ जण जखमी झाले आहे.
गोपालगंजमध्ये नेशनल सिटिझन्स पार्टी (एनसीपी)च्या एका रॅलीवर अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही बाजू्च्या समर्थकांमध्ये तीव्र वाद पेटला आहे. लोक एकमेकांवर दडगफेक, गोळीबार करत आहे. लोकांना मारहाण देखील केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच लष्करही तैनात करण्यात आले आहे. तसेच बॉर्डर गार्ड बांगलादेशचे २०० जवान आणि निम्मलष्कर संवदेनशील भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत.
याच वेळी या परिस्थितीसाठी अवामी लीगच्या पक्षाला मोहम्मद युनूस यांनी जबाबादार धरले आहे. अवामी लीगने युनूस सरकार त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. बांगलादेशच्या गोपालगंजमध्ये शेख हसीना यांच्या पक्षाने नॅशनल सिटीझन्स पार्टीच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांला हाणामारी केली असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
शेख हसीना आणि त्यांच्या समर्थांकमध्ये युनूस सराकरविरोधात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. युनूस सरकारविरोधात निदर्शनेही काढली जात आहेत. मोहम्मद युनूस यांनी या संघर्षावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तरुणांच्या शांततापूर्ण क्रांतिकारी चळवळीवर अवामी लीगने केलेल्या हल्ल्याना मूलभूत अधिकारांचे उल्लंघन म्हटले आहे. त्यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याचे वचनही दिले आहे. तसेच त्यांनी बांगलादेशात हिंसाचाराला वाव नाही असे म्हटले आहे.
दरम्यान मोहम्मद युनूस यांनी अवामी लीग पक्षावर केलेल्या आरोपाचा पुरावा अजून समोर आलेला नाही. यामुळे हिंसाचाराला नेमकी कोणाकडून सुरुवात झाली, हा हिंसाचार जाणूनबुजून करण्यात आला का याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु सध्या बांगलादेशात मोठा गोंधळ उडाला आहे.