India/Russia: भारत आणि रशियाच्या मैत्रीवर नाराज होत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ ऐवजी ५० टक्के टॅरिफ कर आकारला आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, असे म्हणत त्यांनी भारतावर हा कर लादला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली होती. रशियाचे अध्यक्ष पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरूनन चर्चा झाली आहे. व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन युद्धाबाबत माहिती दिल्याचे समजते आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यावर मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे रशिया दौऱ्यावर आहेत.
रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. आज झालेल्या चर्चेत भारत हा कायमच शांततेच्या बाजूने राहिला आहे, असे मोदी यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान भारतावर अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लावल्याने नवीनच वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता भारत काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. तसेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेवर अमेरिका काय भाष्य करते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २७ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका नाराज असल्याचे म्हटले जात आहे. भारत रशियाशी जास्त व्यापार करतो म्हणून ट्रम्प नाराज आहे. त्यामुळे भारतावर ५० टक्के तारीफ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान टाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजते आहे.
Putin’s India visit date finalised – NSA Ajit Doval Sir pic.twitter.com/xbeYdR0dk5
— Lakshay Mehta (@lakshaymehta31) August 7, 2025
सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. मात्र पुतीन हे कधी भारतात येणार हे अधिकृत समोर आलेले नाही. व्लादिमिर पुतीन हे वर्षाअखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.