रशिया विरुद्ध यूक्रेन यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू
रशियाने तयार केले घातक हत्यार
अमेरिकेची डीफेंस सिस्टिमला देऊ शकते चकवा
Russia Burevestnik (SkyFall) Missile: रशियाने एक नवीन हत्यार तयार केले आहे. या घातक शस्त्रामुळे जगाची झोप उडणार आहे. कारण या शस्त्राच्या रेंजमध्ये संपूर्ण जग येणार आहे. रशियाने Burevestnik नावाचे एक घातक क्रुज मिसाईल तयार केले आहे. हे शस्त्र इतके घातल आहे की, व्लादिमिर पुतिन या मिसाईलला अजेय असे विशेषण दिले आहे.
रशिया आणि यूक्रेन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून जोरदार युद्ध सुरू आहे. यूक्रेनला पूर्णपणे नष्ट करण्याचा विडा रशियाने उचलला आहे. तसेच भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत. भारत रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापार करतो म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे रशिया अमेरिकेचे देखील संबंध फारसे चांगले नाहीत.
यूक्रेनवरील हल्ले थांबवावेत म्हणून अमेरिकेसह नाटो देश रशियाला धमकी, विनंती करत आहेत. मात्र रशिया काही आपले हल्ले मागे घेण्यास तयार नाही. या युद्धात कोणी मध्ये असल्यास त्याला देखील गंभीर परिणाम भोगावे लागतील असे पुतीन यांनी इशारा दिला आहे. त्यातच आता रशियाने स्कायफॉल नावाचे मिसाईल तयार केले आहे.
Burevestnik मिसाईल आहे तरी काय?
रशियाने Burevestnik हे क्रुज मिसाईल घातक हत्यार तयार केले आहे. हे परमाणु उर्जेवर हत्यार चालते. अन्य मिसाईलपेक्षा हे वेगळे शस्त्र आहे. याची अनलिमिटेड रेंज आहे. दुसरे मिसाईल इंधन संपल्यावर थांबते. त्यामुळे कितीतरी दिवस हे उडू शकते.
BREAKING: RUSSIA plans to test a new nuclear-powered cruise missile 9M730 "Burevestnik" this week – Reuters pic.twitter.com/TrmqOrIXGb
— Recon & surveillance (@Recon_surv) August 13, 2025
याची रेंज संपूर्ण जगामध्ये आहे. हे जगातील सर्वात घातल मिसाईल आहे. हे अमेरिकेच्या व नाटो देशांच्या संरक्षण प्रणालीला देखील उद्ध्वस्त अथवा चकवा देण्यासाठी सक्षम आहे. दरम्यान या मिसाईलमुळे रशियाची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेची चिंता वाढली आहे.
ट्रम्प यांचा रशियाला इशारा
अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा तापू लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इशारा देत सांगितले आहे की, “माझा संयम संपत चालला आहे आणि तो वेगाने संपत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिका मोठ्या कारवाईसाठी सज्ज आहे.” हा इशारा त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे निर्देशित करत दिला.