War resumes Israel bomb attack on Gaza
जेरुसेलम: एकीकडे युक्रेन-रशिया युद्धाने भयंकर रुप धारण केले आहे, तर दुसरीकडे गाझामध्ये पुन्हा विनाशाचे नवे वादळ उभे राहिले आहे. इस्त्रायलने आज (03 मार्च) गाझावर बॉम्ब हल्ले केले आहेत. हमासने युद्धंबदीच्या दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिल्याने इस्त्रायलने हे हल्ले केले आहेत. इस्त्रायलने युद्ध करार तोडण्याची घोषणा केली असून गाझावर चारी बाजून हल्ला केला आहे. एवढेच नव्हे तर गाझाला मिळमारी मानवतावादी मदतही इस्त्रायलने बंदी केली आहे.
यामुळे तिसरे महायुद्ध सुरु होणार का? युद्धाच्या आगीत एकीकडे युक्रेन आणि दुसरीकडे अरब देश जळमार का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. युक्रेन-रशिया युद्ध आणि गाझा युद्धाने भयानक रुप घेतले आहेय युक्रेन आणि युरोपवर अणुविनाशाचा धोका उभा राहिला आहे. यामुळे अरब देशांवरही महायुद्धाची भिती निर्माण झाली आहे. इस्त्रायलने केलेले हल्ले महायुद्धाची सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलचा रमजानच्या काळात ‘हा’ मोठा निर्णय; जागतिक स्तरावर खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमासशी चर्चा करुन युद्धविराम घडवून आणळा होता. या युद्धविरामांतर्गत हमासने ओलिस ठेवलेल्या इस्त्रायलींची आणि इस्त्रायच्या कैदेत असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात येणार होती. हा युद्धविराम तीन टप्प्यात पूर्ण होणार होता, यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास हमासने नकार दिला आहे. यामुळे इस्त्रायलने गाझावर हल्ला केला आहे. तसेच गाझाला मानतावादी पुरवठा बंद केला आहे. दुसरीकडे अमेरिकेने इस्त्रायलला मोठा शस्त्रास्त्र साठा पुरवल्या असल्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नरसंहार होण्याची शक्यता आहे.
युद्धविराम करार भंग
अमेरिकेची परवानगी मिळल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रदान नेतन्याहूंनी युद्ध करार तोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. इस्त्रायलच्या हवाई दलाने जोरदार बॉम्ब हल्ले केले असून गाझातील बेत हनून येथे ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले असल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यात अनेक इमारती उद्धव्सत झाल्या असून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गाझासोबतच इस्त्रायलने वेस्ट बॅंकवरही हल्ला केला आहे. वेस्ट बॅंकमधील हमासच्या तळांवर हल्ले होत आहेत. इस्त्रायलने युद्धविराम करार भंग केला असून विनाशाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. खरतरं अमेरिकेच्या प्रस्तावानुसार रमजानपर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र इस्त्रायलने कराराचे उल्लंघने केले असून हमासवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा मोठ्या महायुद्धाची भिती निर्माण झाले आहे.