what is israel's David Corridor plan, which creates a stir in syria and world
दमास्कस/जेरुसेलम : गेल्या महिन्यात मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवस संघर्ष तापला होता. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत होते. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आता कुठे इस्रायल-इराणच्या युद्धबंदीनंतर मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होत होते. याच वेळी इस्रायलने सीरियाशी लढाई सुरु केली. सीरियावर हल्ले केल्याने मध्य पूर्व पुन्हा धगधगू लागले.
यामुळे इराम, तुर्की आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. याच वेळी इस्रायलच्या एका धक्कादायक योजनेचा खुलासा करण्यात आला आहे. इस्रायस सीरियाचे चार तुकडे करण्याची योजना आखत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे गंभीर अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्रेटर इस्रायलटे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एका पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप इस्रायलने या योजनेला अधिकृत परवानगी दिलेली नाही, मात्र योजनेसंबंधी काही लष्करी आणि धोरणात्मक घटना दिसून आल्या आहेत.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलची ही योजना सीरियातील ड्रुस समुदायाला जोडणारी आहे. ही योजना उत्तर सीरियातील कुर्दिश राज्यात पर्यंत प्रवेश प्रदान करते. म्हणजेच या योजनेअंतर्गत इस्रायल सीरियामध्ये कायमचा प्रभाव प्रस्थापित करण्याची तयारी करत आहे. या योजनेला ग्रेटर इस्रायलच्या धोरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानल जात आहे. नाईल नदीपासून ते युफ्रेटिस नदीपर्यंत सीमा पसरवण्याचा इस्रायलचा प्रयत्न सुरु आहे.
या योजनेनुसार, सीरियाचे चार भागात विभाजन केले जाणार आहे. यामध्ये सीरियाच्या दक्षिण भागात ड्रुझ समुदायाचे राज्य, पश्चिम भाग अलावाटइट समुदायाचा आणि सीरियाच्या मध्यभागात सुन्नी अरब राज्य, तर उत्तरेस कुर्दिश राज्य स्थापन करण्याचा प्रयत्व सुरु आहे.
या योजनेद्वारे इस्रायलला त्यांच्या सीमावर्तीत क्षेत्रांची सुरक्षा हवी आहे. तसेच सीरियातून इराण समर्थिक देशांचा प्रभाव कमी करायचा आहे. यामुळे इस्रायलने अनेक वेळी सीरियाच्या उत्तरी भागावरील इराण समर्थित संघटनाना सहन केले जाणार नसल्याचे म्हटले आहे.
याच वेळी इस्रायल ड्रुझ समुदायाला पाठिंबा देत आहे. मात्र याचा उद्देश सीरियाच्या राजवटीला कमकुवत करणे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे सीरियाच्या भागात छोटे स्वतंत्र प्रदेश निर्माण करत येतील आणि इस्रायलच्या धोरणाला मदत मिळेल.
इस्रायलच्या या योजनेमुळे तुर्कीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तुर्कीच्या मते, ड्रुझ आणि कुर्दिश समुदायांना स्वायत्तता मिळाल्यास सीरियाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता धोक्यता येईल. यामुळे तुर्कीच्या कुर्दिश कारभारावर परिणाम होईल.
भारत-ब्रिटनमध्ये FTA करारावर स्वाक्षरी; तीन वर्षाच्या दीर्घ चर्चेनंतर ऐतिहासिक करार मुर्तरुपात