What is the Trojan Horse strategy is related to Mahabharata Ukraine used it to attack Russia
कीव: नुकतेच युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धात युक्रेनने ट्रोजन हॉर्स पद्धतीचा वापर केला असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने रशियावर हल्ला करण्यासाठी पेट्यांमध्ये लपवलेले ड्रोन वापरले आहे. या रणनीतीची तयारी गेल्या काही महिन्यांपासूनच युक्रेनने केली होती असे मानले जात आहे. परंतु ही रणनीती नवी नाही. या रणनीतीचा वापर महाभारत युद्धातही करण्यात आला असल्याचे पुरावे आहेत.या रणनीतीमुळे प्रचंड विध्वंसकता निर्माण होण्याची शक्यता आहे. या रणनीतीचा वापर करुनच युक्रेनने रशियाच्या लष्करी तळांवर हल्ला केला आणि रशियाला हादरवून टाकले.
ट्रोजन हॉर्स रणनीती ही एक ग्रीक इतिहासातील टॉय युद्धावर आधारित रणनीती आहे. ही युद्धनीती महाभारतामध्येही वापरण्यात आली होती. यामध्ये ग्रीक सैन्याने मोठा लाकडी घोडा टॉय शहराला भेट म्हणून दिला, पण या घोड्यात सैनिक लपले होते. या सैनिकांनी संधी मिळताच एका रात्रीत शहर उद्ध्वस्त केले.
हीच रणनीती आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वापरली जात आहे. ड्रोन हल्ले, याबर हल्ले, खोटी (फेक) माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पसरवून दिशाभूल केली जात आहे.
काय आहे महाभारताशी संबंध?
या युद्धनीतीचा वापर महाभारतामध्येही करम्यात आला होता. या रणनीतीला द्रोणाचार्य बळी पडले होते. त्यांना युद्धातून हटवण्यासाठी युधिष्ठिरने अश्वत्थामा हत: (अश्वत्थामा मरण पावला) असे आर्धे सत्य सांगतिले. खरं तर युद्धात अश्वत्थामा हा हत्ती होता, जो मरण पावला होता. परंतु द्रोणाचार्यांना त्यांचा पुत्र मरण पावला असे वाटले. यानंतर द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि आपली शस्त्रे सोडून दिली. युधिष्ठिरने ट्रोजन हॉर्स या रणनीतीचा वापर करुन अश्वत्थामाच्या खोट्या मृत्यूची बातमी पसरवली.
द्रोणाचार्यांच्या पुत्राचे नाव अश्वत्थामा होते. यामुळे द्रोणाचार्यांचा गोंधळ उडाला. त्यावेळी द्रोणाचार्यांना कौरवांच्या बाजूने लढावे लागले होते. यामुळे नेहमी सत्य बोलण्यासाठी ओळखल्या जाणार्या धर्मराज युधिष्ठिर यांनी ही रणनीती अवलंबवली. अशीच परिस्थिती काहीशी रशिया-युक्रेनयुद्धातही दिसून आली आहे.
या ट्रोजनहॉर्स रणनीतीचा वापर महाभारताच्या चक्रव्यूह मध्येही करण्यात आला. चक्रव्यूहमधून अभिमन्यूला बाहेर पडण्याचा मार्ग माहित नव्हता. या चक्रव्यूमध्ये अडकवून त्याला मारण्यात आले. ही देखील कौरवांची फसवणून रणनीती होती. याचा वापर करुन सुर्यपुत्र कर्णाकडून देखील कवच कुंडल मागण्यासाठी इंद्रदेवांनी ब्राह्मणाचा वेळ घेताल. ही देखील देवांची एक ट्रोजन रणनीती होती.
या सर्व उदाहरणांवरुन युद्धामध्ये धोका, मनोविज्ञान आणि रणनीती शस्त्राइतकीच महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. अशीच काहीशी रणनीती अलिकडच्या आधुनिक युगाच्या युद्धांमध्ये देखील दिसून येत आहे.
भारताने देखील ट्रोजन हॉर्स या रणनीतीचा वापर करुन ऑपरेशन सिंदूर मोहीमेने पाकिस्तानला धक्का दिला. भारताने देशभरात मॉक ड्रिलची घोषणा केली. या मॉक ड्रीलमुळे भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानला वाटले. पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या तयारीतही नव्हता आणि भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले.