What rare disease do two people in Britain and America suffer from when there is nothing to fear
ब्रिटनमधील जॉर्डी सरॅनिक व अमेरिकेतील एस.एम. नावाच्या महिलेला दुर्मिळ आजारामुळे भीतीची भावना उरलीच नाही.
अमिगडाला नावाच्या मेंदूच्या भागामुळे भीती नियंत्रित होते, मात्र या दोघांच्या आजारामुळे तो भाग निष्क्रिय झाला.
भीतीचा अभाव जीवन धोकादायक बनवतो आणि सामाजिक वर्तनावरही खोल परिणाम करतो.
lipoid proteinosis brain disorder : भीती( Fear) ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. एखादा साप दिसला की आपण मागे सरकतो, अपघाताचा धोका दिसला की सतर्क होतो किंवा गडद रात्रीत पाऊल टाकताना आपले हृदय जलद धडधडते. ही भीती आपल्याला धोका टाळायला शिकवते. पण तुम्ही कल्पना करा, जर कोणालाच कधीही भीती वाटली नाही तर त्याचे आयुष्य कसे असेल? ही केवळ कल्पना नाही, तर वास्तव आहे. ब्रिटनमधील जॉर्डी सरॅनिक आणि अमेरिकेतील एस.एम. नावाच्या महिलेला असा दुर्मिळ आजार( Rare disease) आहे ज्यामुळे त्यांना अजिबात भीती वाटत नाही.
ब्रिटनमधील जॉर्डी सरॅनिकला २००५ मध्ये कुशिंग सिंड्रोम झाल्याचे निदान झाले. या आजारामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल प्रचंड प्रमाणात तयार होतो. डॉक्टरांनी त्याच्या अधिवृक्क ग्रंथी काढून टाकल्या. उपचार यशस्वी झाले, पण यानंतर एक अनोखी घटना घडली त्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली. २०१२ मध्ये त्याने डिस्नेलँडमधील धडकी भरवणारा रोलर कोस्टर चालवला, विमानातून स्कायडायव्हिंग केले आणि उंच कड्यावरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरला. या प्रत्येक प्रसंगी सामान्य माणसाचे हृदय जोरात धडधडले असते, हात थरथरले असते; पण जॉर्डी मात्र शांत होता. ना धडधड, ना घाम, ना काळजी जणू भीती त्याच्या शब्दकोशातच नव्हती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
अमेरिकेतील एस.एम. या महिलेचे प्रकरण अजूनच आश्चर्यकारक आहे. तिला अर्बाक-विथे डिसीज नावाचा दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे. याला लिपॉइड प्रोटीनोसिस असेही म्हटले जाते. या आजारामुळे तिच्या मेंदूमधील अमिगडाला हा भीती नियंत्रित करणारा भाग पूर्णपणे नष्ट झाला. शास्त्रज्ञांनी तिच्यावर असंख्य प्रयोग केले. भयपट चित्रपट दाखवले, तिला साप-कोळ्यांसमोर आणले, झपाटलेल्या घरात नेले पण काहीच फरक पडला नाही. ती निर्भयपणे सर्वांच्या जवळ जायची, अगदी धोक्याच्या वस्तूंच्या देखील. उलट, ती अधिक उत्सुकतेने पुढे सरसावत असे.
एस.एम. चे वर्तन सर्वसामान्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सामान्य व्यक्तीला एखाद्या अनोळखी व्यक्तीपासून किमान १ मीटर अंतर ठेवणे सोयीस्कर वाटते, पण एस.एम. ला फक्त ०.३४ मीटर अंतर पुरेसे वाटे. म्हणजे ती खूपच जवळ यायची. यामुळे ती अनेकदा धोकादायक परिस्थितीत सापडली. तिला चाकू दाखवून धमकावले गेले, अगदी बंदुकीच्या धाकावरही आणले गेले पण तिच्या मनात क्षणभरही भीती निर्माण झाली नाही. त्यामुळे तिला स्वतःच्या सुरक्षेचे भानच उरले नाही.
शास्त्रज्ञांच्या मते भीती दोन प्रकारे कार्य करते
बाह्य धोका : प्राणी हल्ला, अपघात, शस्त्रास्त्र वगैरे. हा भाग अमिगडाला नियंत्रित करतो.
आंतरिक धोका : श्वास गुदमरला, कार्बन डायऑक्साइड वाढला, असे प्रसंग. हे मेंदूच्या स्टेममधून नियंत्रित होते.
एका प्रयोगात जेव्हा एस.एम. ला कार्बन डायऑक्साइड श्वसनाद्वारे देण्यात आले तेव्हा तिने पहिल्यांदाच भीती अनुभवली. यावरून कळले की भीती ही फक्त अमिगडालावर अवलंबून नसून मेंदूतील इतर भागही यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा
शास्त्रज्ञ डॅनियल फेनस्टाईन म्हणतात, ‘‘जर एखाद्या प्राण्याला अमिगडालाशिवाय जंगलात सोडले तर तो काही दिवसांतच मरेल कारण त्याला धोका ओळखता येणार नाही.’’ मात्र एस.एम. सारखे लोक पन्नास वर्षांहून अधिक काळ अमिगडालाशिवाय जगले आहेत. यातून हे स्पष्ट होते की भीती ही फक्त धोका टाळण्यासाठी नाही, तर ती आपल्या सामाजिक वर्तनाला व भावनिक संतुलनाला देखील दिशा देते. भीतीशिवाय जगणे म्हणजे केवळ साहस नव्हे, तर एक सततचा धोका आहे.