Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zaporizhzhia Nuclear Plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा

Zaporizhzhia nuclear plant : रशियाच्या नियंत्रणाखालील झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाह्य वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 27, 2025 | 02:19 PM
Zaporizhia nuclear plant lost external power for 3 days raising safety fears over fuel overheating

Zaporizhia nuclear plant lost external power for 3 days raising safety fears over fuel overheating

Follow Us
Close
Follow Us:
  • युरोपातील सर्वात मोठा झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प गेल्या तीन दिवसांपासून बाह्य वीजपुरवठ्याविना, फक्त डिझेल जनरेटरवर चालतोय.

  • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) प्रमुखांनी परिस्थितीला अत्यंत चिंताजनक म्हटले असून, सुरक्षा धोक्याचा इशारा दिला आहे.

  • तज्ञांचा आरोप-रशिया जाणूनबुजून संकट निर्माण करून जगाला दाखवत आहे की या प्रकल्पाचा ताबा फक्त त्यांच्याकडे आहे.

Zaporizhzhia nuclear plant power outage : युक्रेन आणि रशिया( Russia-Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प( Zaporizhia nuclear plant) पुन्हा एकदा धोक्याच्या छायेत आला आहे. युरोपातील सर्वात मोठा असलेला हा प्रकल्प मागील तीन दिवसांपासून पूर्णपणे बाह्य वीजपुरवठ्याविना आहे. अशा परिस्थितीत केवळ डिझेल जनरेटरवर अवलंबून असलेल्या या प्रकल्पामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

वीजपुरवठा खंडित कसा झाला?

मंगळवारी प्रकल्पातून बाहेर जाणारी शेवटची उच्चदाबाची वीजवाहिनी अचानक बंद पडली. रशियन बाजूने सांगण्यात आले की, युक्रेनियन सैन्याच्या गोळीबारामुळे ही लाईन खराब झाली असून दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळून लावत, “आम्ही कधीच प्रकल्पावर हल्ला करणार नाही, कारण तो अत्यंत धोकादायक ठरू शकतो,” असा दावा केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार

का आहे ही परिस्थिती धोकादायक?

अणुऊर्जा प्रकल्पात साठवलेले इंधन सतत थंड ठेवणे आवश्यक असते. अन्यथा ते गरम होऊन वितळण्याचा धोका निर्माण होतो. थंड करण्यासाठी बाह्य वीजपुरवठा आवश्यक असतो. तो खंडित झाला की, बॅकअप डिझेल जनरेटर वापरले जातात. सध्या प्रकल्प केवळ अशाच जनरेटरवर चालत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर डिझेलचा पुरवठा खंडित झाला, तर काही आठवड्यांत अणुभट्ट्या अतिगरम होऊन गंभीर अपघात घडू शकतो.

IAEA ची गंभीर चेतावणी

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी या परिस्थितीला “अत्यंत चिंताजनक” असे संबोधले आहे. त्यांनी अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, पण तरीही कोणताही ठोस उपाय सापडलेला नाही. दरम्यान, ग्रीनपीस आणि युक्रेनियन अधिकारी याही परिस्थितीला थेट “जगाच्या अणुसुरक्षेसाठी धोका” असेच म्हणत आहेत.

रशियाचा हेतू काय?

आंतरराष्ट्रीय तज्ञांचा अंदाज आहे की रशिया मुद्दामच या प्रकल्पाला अस्थिर करून जगाला दाखवू इच्छित आहे की झापोरिझिया प्रकल्पाचा ताबा केवळ त्यांच्याकडे आहे.

  • रशिया हा प्रकल्प त्यांच्या पॉवर ग्रिडशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

  • काही अहवालांनुसार, रशिया लवकरच एका रिॲक्टरला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतो.

  • ग्रीनपीस तज्ञांनी उपग्रह प्रतिमांच्या आधारे असा दावा केला आहे की रशियाने मारियुपोलपासून जवळपास १२५ मैलांची नवी वीजवाहिनी उभारली आहे, जी या प्रकल्पाला जोडण्याचा उद्देश असावा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ड्रग्ज विक्रेत्यांशी…’, Bagram Air Base वरून अमेरिकेला घेरणाऱ्या चीनचा पर्दाफाश; अमरुल्लाह सालेह यांचा धक्कादायक दावा

धोका किती गंभीर?

२०११ मध्ये झालेल्या जपानमधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर युरोपियन नियामकांनी अणुऊर्जा प्रकल्प बाह्य वीजपुरवठ्याविना किती वेळ चालू राहू शकतो, याची चाचणी केली होती. त्यावेळी ही मर्यादा ७२ तास निश्चित करण्यात आली होती. झापोरिझिया प्रकल्पाने आता ती मर्यादा ओलांडली आहे. सध्याच्या घडीला अणुभट्ट्या थंड ठेवल्या जात असल्या तरी, परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर अपघाताचा धोका टाळता येणार नाही. तज्ज्ञांचे मत आहे की, फुकुशिमाइतका तात्काळ धोका नसला तरी दीर्घकालीन दृष्टीने ही परिस्थिती जगासाठी अत्यंत धोकादायक आहे.

Web Title: Zaporizhia nuclear plant lost external power for 3 days raising safety fears over fuel overheating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • International Political news
  • Russia
  • Russia Ukraine War
  • ukraine

संबंधित बातम्या

Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार
1

Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार

रशिया जगाला संपवणार? जपानजवळ उभी केली Nuclear Submarine; संपूर्ण विश्वात माजली खळबळ
2

रशिया जगाला संपवणार? जपानजवळ उभी केली Nuclear Submarine; संपूर्ण विश्वात माजली खळबळ

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
3

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

India Russia US: युक्रेनबाबत काय योजना आहे? संशयाच्या सावटाखाली Modi-Putin यांच्यात फोन कॉल
4

India Russia US: युक्रेनबाबत काय योजना आहे? संशयाच्या सावटाखाली Modi-Putin यांच्यात फोन कॉल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.