सारा मिलिकेन ही एक ट्रिपल साइझ मॉडेल असून सध्या ती मिस अलाबामा 2024 ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली आहे. मिस नॅशनल अलाबामाचा ‘किताब जिंकण्यासाठी साराने आठ वर्षे काम केले. मे 2024 मध्ये, तीन प्रयत्नांनंतर तिने मिस अलाबामा 2024 च्या ब्युटी कॉन्टेस्टचा मुकूट आपल्या नावावर केला. यानंतर WKRG ने तिची मोबाईलवर मुलाखत घेतली आणि त्यांनंतरच तिची ही स्टोरी सर्वत्र व्हायरल झाली.
कोण आहे सारा मिलिकेन?
सारा मालिकेनं ही अटमोरे येथील आहे. तिचे वय 23 वर्ष आहे. साराने सांगितले की, तिने 8 वर्षांपासून मिस अलाबामा होण्यासाठी स्वप्न पाहिले होते. या वर्षी तिने क्राऊन जिंकण्यासाठीचा तिसरा प्रयत्न केला, यापूर्वी दोनदा तिने प्रयत्न केला होता मात्र याआधी ती स्पर्धा जिंकू शकली नाही. तिने प्रथम वयाच्या १५ व्या वर्षी नॅशनल अमेरिकन मिस स्पर्धेत जिंकण्याच्या तीव्र इच्छेने भाग घेतला होता. मात्र तेव्हा ती जिंकू शकली नाही.
[read_also content=”माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर https://www.navarashtra.com/world/israel-hamas-war-father-and-son-duo-confess-to-raping-israeli-woman-and-killing-her-537823.html”]
यासाठी केले अनेक प्रयत्न
पुढे तिने सांगितले की, “मी खूप मेहनत घेतली आणि जिंकण्यासाठी मी माझ्यामध्ये अनेक बदल घडवून आणले. पॅजन्ट जिंकण्यासाठी त्यांना जे हवे होते ते सर्व करण्याचा मी प्रयत्न केला. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांआधी, मला एका मुलाने सांगितले होते की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी ‘खूप कुरूप’ आहे.
मी त्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी आणखीन उत्साहाने पॅजन्टमध्ये भाग घेतला. मात्र मला या स्पर्धेचा भाग होऊ दिले गेले नाही. “मला अपमानित केले गेले. तोच विचार करून मी पुन्हा कधीही या स्पर्धात भाग न घेण्याची शपथ घेतली. म्हणून मी सात वर्षे भाग घेतला नाही. मात्र, मी हार मानली नाही, हे सिद्ध करण्यासाठी मी या NAM मंचावर परतले. मी हे सर्व साध्य करू शकले. मला बोललेल्या क्षुल्लक गोष्टींपेक्षा माझे कर्त्तृत्व अधिक आहे.
जिद्दीला आणि चिकाटीला सलाम
तिच्या या चिकाटीला अखेर तिच्या नुकत्याच मिळालेल्या विजयाचे फळ मिळाले. तिच्या पेजेंट प्लॅनेट प्रोफाइलवर, साराने फर्स्ट Plus Size NAM मिस अलाबामा होण्याचे तिचे उद्दिष्ट व्यक्त केले. तिने सांगितले की, तिने एका रात्रीत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर 2500 च्या वर फॉलोवर्स मिळवले. यावरून हे सिद्ध होते की, तुमचे शरीर कसे दिसते ते महत्त्वाचे नाही, तुम्ही कुठून आलात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही तुमच्या मनाला पटेल ते काहीही करू शकता आणि त्यात यशस्वीही होऊ शकता. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे.






