श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले.श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविधरंगी फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते व-हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.