'नागिन'च्या भेटीला अक्षय कुमार आणि राजपाल यादव
‘भूत बंगला’बाबतचा उत्साह वाढत असतानाच अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांनी ‘नागिन’मध्ये खास हजेरी लावली. सुरू असलेल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार यांनी ‘महानाग’ची भूमिका साकारत नागिनला मार्गदर्शन केले. ‘नागिन’च्या टीमकडून दोन्ही कलाकारांचे भव्य स्वागत करण्यात आले, आणि हा क्षण पाहण्यासारखा ठरला. सध्या नागिन ७ ही मालिका कमालीच्या वळणावर असून प्रेक्षकांची ही सर्वात आवडती मालिका आहे. एकता कपूरच्या या सिरीजमधील ही ७ वी सिरीज असून प्रियांका चहर चौधरी नागिनची मुख्य भूमिका साकारत आहे.
Video : Naagin 7 च्या सेटवरून Priyanka Chahar Choudharyचा पहिला व्हिडिओ लीक, इंटरनेटवर धुमाकूळ
प्रियदर्शनचे दिग्दर्शन
‘भूत बंगला’मधून अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची बहुप्रतीक्षित पुनर्भेट होत आहे. या जोडीने यापूर्वी अनेक आयकॉनिक कॉमेडी हिट्स दिल्या आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि भन्नाट कथनशैलीमुळे पुन्हा एकदा धमाल एंटरटेनरची अपेक्षा वाढली आहे.
बालाजी मोशन पिक्चर्स (Balaji Telefilms Ltd. चा विभाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या सहयोगात ‘भूत बंगला’ सादर होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव प्रमुख भूमिकेत आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार, शोभा कपूर व एकता आर कपूर निर्मित ‘भूत बंगला’ १० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अक्षय कुमारने प्रमोशनसाठी सेटवर भेट दिली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले
कधी होणार प्रदर्शित
अक्षय कुमारचा हा हॉररपट 10 एप्रिल, 2026 रोजी सर्व थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एकता कपूरसह याआधीदेखील अक्षय कुमारने काम केले आहे. याशिवाय प्रियदर्शन आणि अक्षय कुमारचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत आणि त्यामुळेच या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत. दरम्यान सध्या सगळीकडे धुरंधरचीच वाहवा असून एप्रिलमध्ये येणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे






