वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून चारही मतदारसंघांसाठी रस्ते व पुलांच्या कामांसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गडचिरोलीला स्टील हब म्हणून विकसित करण्याच्या निर्णयामुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले. गडचिरोलीतील खनिज संपत्तीचा लाभ घेण्यासाठी उद्योगांना शेजारील जिल्ह्यांतही प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले असून यामुळे वर्धा, भंडारा, चंद्रपूरसह संपूर्ण परिसरात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे वर्धा व कोकणातील संपर्क अधिक मजबूत होणार असून पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 बाबतही त्यांनी स्पष्टीकरण देत नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात आले असल्याचे सांगितले.