Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Iran Conflict : महाशक्तींचा थरार! रशियाची बुद्धी अन् चीनची भिंत; पुतिन-जिनपिंग यांच्या चक्रव्यूहात ‘असे’ फसले डोनाल्ड ट्रम्प

Trump Iran Attack Cancelled 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणवर हल्ला करू शकत नाहीत, कारण रशिया आणि चीनने संयुक्तपणे इराणसाठी एक अभेद्य 'चक्रव्यूह' तयार केला आहे. रशियाने गुप्त माहिती पुरवली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 20, 2026 | 12:38 PM
why trump cannot attack iran russia china military chakrvyuha pentagon warning 2026

why trump cannot attack iran russia china military chakrvyuha pentagon warning 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प बॅकफूटवर
  • पुतिन-शी जिनपिंग यांचे ‘चक्रव्यूह’
  • पेंटागॉनचा थेट इशारा

Trump Iran Attack Cancelled 2026 : जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्यपूर्वेत (Middle East) सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला खरा, पण त्यानंतरच्या अवघ्या ४१ दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तब्बल २६ वेळा इराणला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक वेळी ट्रम्प यांना केवळ धमक्या देऊनच मागे हठावे लागले आहे. ट्रम्प यांच्या मते, सौदी अरेबिया, कतार आणि युएई सारख्या मित्र देशांनी त्यांना मध्यस्थीसाठी दोन-तीन दिवस थांबायला सांगितले आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ आणि गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार हे कारण केवळ वरवरचे असून पडद्यामागचे सत्य अत्यंत भयानक आहे. रशिया आणि चीनने मिळून इराणभोवती असे एक अभेद्य ‘चक्रव्यूह’ रचले आहे, ज्याला छेदणे सध्या अमेरिकेलाही अशक्य झाले आहे.

पुतिन यांच्या गुप्त माहितीने फिरवला पूर्ण खेळ

या संपूर्ण खेळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणला दिलेली गुप्तचर माहिती (Intelligence Data) सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरली आहे. रशियाने अमेरिकेच्या लष्कराची आणि विशेषतः त्यांच्या हवाई दलाची अशी काही गुपिते इराणच्या हाती सोपवली आहेत, ज्यामुळे अमेरिकेचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. इराणला आता अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या आणि बॉम्बर्सच्या उड्डाणाच्या अचूक पद्धती माहीत आहेत. एवढेच नव्हे, तर अमेरिकन वैमानिकांचे वर्तन कसे असते, ती विमाने हवेत असताना नेमक्या कोणत्या वेळी इंधन भरतात आणि त्यांची इलेक्ट्रॉनिक जॅमिंग करण्याची यंत्रणा कशी काम करते, याची इत्थंभूत माहिती इराणकडे आहे. यामुळे अमेरिका हल्ला करण्यापूर्वीच इराणला त्याचा सुगावा लागतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार

चीनच्या तंत्रज्ञानाने उभारली अभेद्य संरक्षण भिंत

रशियाने इराणला डोळे दिले, तर चीनने त्यांना लढण्यासाठी मजबूत हात दिले आहेत. युद्धविरामाच्या काळाचा गैरफायदा घेत चीनने इराणच्या संपूर्ण हवाई संरक्षण यंत्रणेचा (Air Defense System) चेहरामोहरा बदलून टाकला आहे. चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इराण आता अमेरिकेची हायपरसोनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला हवेतच रोखण्यास सक्षम झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेची सर्वात आधुनिक मानली जाणारी ‘स्टील्थ’ लढाऊ विमाने शोधून ती पाडण्याचे तंत्रज्ञान चीनने इराणला दिले आहे. या इलेक्ट्रॉनिक युद्धात (Electronic Warfare) इराण आता थेट अमेरिकेला टक्कर देण्याच्या स्थितीत पोहोचला आहे.

In the name of making America safer, Trump has made every American weaker. We’ve depleted half of most missile stockpiles in Iran. Trump’s own CIA says Iran can withstand this blockade for months longer. If Trump does strike Iran, they’ll torch all energy infrastructure in a… https://t.co/pyc6wOPUiz — Adam Mockler (@adammocklerr) May 17, 2026

credit – social media and Twitter

पेंटागॉनच्या त्या एका इशाऱ्याने ट्रम्प यांचे धाबे दणाणले!

इराणी वृत्तसंस्था ‘तनसिम न्यूज’ने दिलेल्या एका खळबळजनक वृत्तानुसार, ट्रम्प यांनी इराणवर एका मोठ्या विमानाद्वारे हल्ल्याचा आदेश फायनल केला होता. मात्र, हल्ल्याच्या अवघ्या काही तास आधी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ने व्हाईट हाऊसला थेट रेड सिग्नल दिला. पेंटागॉनने ट्रम्प यांना स्पष्ट बजावले की, “इराण आता पूर्वीसारखा कमकुवत राहिलेला नाही. त्यांच्याकडे आपली विमाने शोधण्याची आणि ती पाडण्याची अचूक यंत्रणा सज्ज आहे. जर आज आपण हल्ला केला, तर अमेरिकेची अनेक महागडी लढाऊ विमाने इराण नष्ट करेल आणि आपले शेकडो वैमानिक मारले जातील.” या अंतर्गत इशाऱ्यानंतर आणि लष्कराच्या दबावामुळेच ट्रम्प यांना आपला आदेश मागे घ्यावा लागला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष

इराणचा बाणा: “शरणागती नाही तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे झेला!”

दुसरीकडे, रशिया आणि चीनची साथ मिळाल्यामुळे इराणचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी अमेरिकेला थेट शब्दांत सुनावले आहे की, “अमेरिकेने आमच्या अटी मान्य कराव्यात, अन्यथा त्यांना आमच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपुढे गुडघे टेकावे लागतील.” इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेच्या दबावासमोर झुकणार नाही. ट्रम्प अजूनही आपण इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही असा दावा करत असले, तरी सध्या तरी पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या चक्रव्यूहाने अमेरिकेच्या ‘सुपरपॉवर’ असण्याच्या अहंकाराला मोठा धक्का दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ला ऐनवेळी का मागे घेतला?

    Ans: अमेरिकन संरक्षण मुख्यालय पेंटागॉनने दिलेल्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांनी हल्ला थांबवला, कारण इराणकडे आता अमेरिकन विमाने पाडण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आहे.

  • Que: रशिया आणि चीनने इराणला नेमकी काय मदत केली आहे?

    Ans: रशियाने इराणला अमेरिकन हवाई दलाची गोपनीय माहिती दिली आहे, तर चीनने इराणची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense System) मजबूत केली आहे.

  • Que: अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम कधी झाला होता?

    Ans: अमेरिका आणि इराण यांच्यात ८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे युद्धविराम झाला होता.

Web Title: Why trump cannot attack iran russia china military chakrvyuha pentagon warning 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • iran
  • Russia

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप
1

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन
2

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास
3

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
4

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.