Will US President Trump end the Russia-Ukraine war in 100 days
जेरुसेलम: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा पुनरामगन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजी वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी युक्रेनसाठी विशेष दूत म्हणून नियुक्त केलेल्या कीथ केलॉग यांना 100 दिवसांत युक्रेन संघर्ष समाप्त करण्याचे आव्हान दिले आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी 24 तासांत युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा दावा केला होता, पण सध्याच्या घडीला त्यावर फारशी प्रगती दिसून आलेली नाही.
ट्रम्प स्वतः घेत आहेत पुढाकार
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प हे या शांती प्रक्रियेत स्वतःहून हस्तक्षेप करण्यासाठी तयार आहेत. मात्र, केलॉग यांना राजनयिक अनुभवाचा अभाव असल्याने ते रशियासोबत थेट वाटाघाटी करण्याची शक्यता कमी असेल असा दावा तज्ञांनी व्यक्त केला आहे. केलॉग यांनी 100 दिवसांत ही डील पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, युक्रेनमधील संघर्ष थांबवणे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील इतर वचनांपेक्षा अधिक कठीण असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.
युक्रेनला लष्करी मदत रोखण्याचा इशारा
21 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना युक्रेनला लष्करी मदत थांबवण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच, त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. पुतिन यांनी देखील ट्रम्प यांच्या या भूमिकेचा स्वीकार केला असून नवीन अमेरिकन प्रशासनासोबत वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली असल्याची वृत्त आहे. त्यांनी युक्रेनमधील संघर्षाचे मूळ कारण शोधून काढण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांचा रशियाला इशारा
रशियाने ट्रम्प आणि त्यांच्या टीमकडून येणाऱ्या संपर्काचा पुनरुज्जीवन करण्याच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुतिन यांनी युक्रेन संकट संपवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धाचा धोका टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरम्यान अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी रशियाला युद्ध थांबवण्यावर तोडगा न काढल्यास निर्बंध लादले जातील असा इशारा दिला होता. यामुळे आता रशिया-युक्रेन युद्ध काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
100 दिवसांत संघर्षविराम होईल का?
याचदरम्यान व्लादिमिर पुतिन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी देखील व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली होती. युक्रेनमध्ये युद्ध थांबवणे ही एक मोठी कूटनीतिक आणि राजकीय समस्या आहे. ट्रम्प यांच्या धोरणांवर यश अवलंबून आहे की ते केवळ निवडणूक वाद्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीसाठी पुढे येतात का, की ट्रम्प यांच्या 24 तासांच्या वचनापेक्षा आता दिलेल्या 100 दिवसांच्या उद्दिष्टाकडे लक्ष लागले आहे.