Will World War III erupt US nuclear submarines are on our target says Russia
America Russia news : मॉस्को : अमेरिका (America) आणि रशियातील संबंध अधिक बिघडत चालले आहेत. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या समुद्रात अणु पाणबुड्या तैनात केल्या असल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले की, या पाणबुड्या बऱ्याच काळापासून रशियावर नियंत्रण ठेवून आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान यावर रशियाने (Russia) प्रतिक्रिया दिली असून ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. तसेच यामुळे तिसऱ्या महायुद्धाची देखील भीती निर्माण झाली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या संसदेचे सदस्य व्हिक्टर वोडोलात्स्की यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रशांत महासागरात रशियाच्या पाणबुड्या अमेरिकेच्या पाणबुड्यांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी आमच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी पाठवलेल्या पाणबुड्यांवर आमची आधीच नजर आहे, आता त्यांच्या पाणबुड्या आमच्या निशाण्यावर आहेत. अशी माहिती त्यांनी रशियन सरकारी वृत्तसंस्था TASS ला दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी (०१ ऑगस्ट) अमेरिकेने अणु पाणबुड्या रशियाच्या जवळ महासागरात तैनात करण्याचा आदेश दिला होता. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षणार्थ हे पाऊल उचलले होते. ट्रम्प यांनी म्हटले की, रशियाच्या मूर्ख आणि भडकाऊ विधानांना उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच त्यांनी शब्दांचे महत्व जास्त असते आणि याचे गंभीर परिणाम होतात, मात्र यावेळी असे होणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता.
याच वेळी दुसरेकडे रशियाचे संसदेचे सदस्य व्हिक्टर वोडोलात्स्की यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, अमेरिकेने पाठवलेल्या अणु पाणबुड्या आधीच आमच्या निशाण्यावर आहे. आता केवळ रशिया आणि अमेरिकेत एक महत्वपूर्ण वाटाघाटी करार करण्याची वेळ आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चा बंद होतील आणि जगभर शांतता पसरेल.”
मात्र याच वेळी रशियाच्या ग्लोबल अफेयर्स मासिकाचे संपाद फ्लोदोर लुक्यानोव्ह यांनी ट्रम्प यांच्या विधानाला गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प भावनात्मक निर्णय घेतात. तसेच त्यांचे इशारे देखील केवळ शाब्दिक मर्यादेपर्यंतच असतात.
FAQs (संबंधित प्रश्न)
रशिया आणि अमेरिकेत का सुरु आहे वाद?
गेल्या तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. ट्रम्प यांनी रशियाला युद्ध थांबवण्याचा इशारा दिला आहे, मात्र अद्यापही हे युद्ध सुरुच आहे. यामुळे दोन्ही देशात वाद सुरु आहे.
रशिया आणि अमेरिकेत युद्ध झाल्यास काय परिणाम होईल?
रशिया आणि अमेरिका युद्धाचा जागतिक स्तरावर परिणाम होणार आहे. यामुळे भारतासारख्या अनेक मोठ्या देशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.यामुळे जगभरातील शेअर बाजार ढासळण्याची, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर