Woman got fired for leaving work one minute early
सियोल: एक मिनिटे लवकर ऑफिसमधून बाहेर पडल्यामुळे एक महिलेवर नोकरी गमवण्याची वेळ आली आहे. ही घटना दक्षिण चीनमध्ये घडली असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कंपनीतून एक मिनिटे लवकर कामावरुन घरी गेली. यामुळए कंपनीने तिला नोकरीवरुन काढून टाकले. परंतु या महिलेने झालेल्या अन्यायाविरोधात तातडीने न्यायालयात धाव घेतली आणि तिला या प्रकरणी न्याय मिळाला आहे. South China Morning Post ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझोउ शहरातील एका कंपनीत तीन वर्षे नोकरी करणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. या महिलेची ओळख वांग याने करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांग यांचे काम अतिशय उत्कृष्ट आणि चांगले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. मात्र कंपनीच्या एचआर मॅनेजरने एक दिवस तिला फोन करून सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले आहे की ती सहा वेगवेगळ्या दिवशी एक मिनिट लवकर ऑफिसमधून गेली आहे. यानंतर कंपनीने वांग यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट नोकरीवरून काढून टाकले.
यानंतर वांग यांनी स्थानिक कामगार विभागाकडे तक्रार दाखल केली. तसेच न्यायालयातही खटला दाखल केला. या प्रकरणावर न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, एक मिनिट लवकर निघणे हे फारसे गंभीर स्वरूपाचे नाही, आणि कंपनीने वांग यांना ना कोणतेही पूर्वसूचना ने देता त्यांना त्यांच्या वागणुकीत सुधारणा करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे कंपनीचा निर्णय अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने घोषित केले.
कोर्टाने संबंधित कंपनीला वांग यांना भरपाई देण्याचे आदेश दिले, स्थानिक कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये 1.5 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत भरपाई वांग यांना मिळू शकते. ग्वांगझोउ लायक्सिन लॉ फर्ममधील वकील लियु बियुन यांनी म्हटले की, अशा किरकोळ कारणावरून कर्मचाऱ्याला कामावरून काढणे हा निर्दयीपणा आहे.
या घटनेवर चिनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी अशा कठोर कंपन्यांच्या नियमांवर टीका केली आहे. “कामावर वेळेआधी येणाऱ्यांना प्रोत्साहन का दिले जात नाही?” असे म्हटले जात आगे. तसेच “अशा कंपन्यांना शिक्षा झाली पाहिजे. या पूर्वीही चीनमध्ये कामाच्या ठिकाणच्या कठोर नियमांवर वाद झाला आहे. मार्चमध्ये अनहुई प्रांतातील एका कंपनीने मोबाईल वापरावर बंदी घालणे आणि कामाच्या वेळेत बाहेर जाण्यास मनाई करणे, असे तुरुंगासारखे नियम लावल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला होता.