Iran US Talks: अमेरिका इराणसमोर नतमस्तक? अणु प्रकल्पासंबंधी खामेनेईंची 'ही' अट केली मान्य? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन/तेहरान: इराण आणि अमेरिकेत शनिवारी (12 एप्रिल) उच्चस्तरीय चर्चा सुरु झाली आहे. इराणच्या अणु प्रकल्पासंबंधी ही बैठक होती. दोन्ही देशांत अणु करारावर प्रश्न सोडवण्यासाठी थेट चर्चा होणार होती. ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणने थेट चर्चा करण्यास सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात येईल. परंतु इराणच्या म्हणण्यानुसार, ही चर्चा अप्रत्यक्षपणे झाल्याचे दिसून आले आहे. यामगचे कारण ही चर्चा ओमानच्या अधिकाऱ्यांच्या आणि इराणी अधिकाऱ्यांमध्ये होणार आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराण अमेरिकेत पहिली चर्चा अप्रत्यक्षपणे पार पडली असून पुढील आठवड्यात होणारी चर्चा देखील ओमनीच्या मध्यस्थानी होणार आहे. ही चर्चा अप्रत्यक्ष असणार आहे. या बैठकीत केवळ इराणच्या अणु कार्यक्रमासंबंधितच नव्हे तर त्यांच्यावर निर्बंधांवर देखील असमार आहे. यावरुन स्पष्ट होते की, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न करता ट्रम्प यांना झुकण्यास भाग पाडले आहे. इराणच्या अटींवर ही चर्चा सुरु झाली आहे. यामुळे ही चर्चा आता काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FM @Araghchi is concluding his visit to #Oman and heading back to Tehran after a round of indirect talks with the U.S. representative over sanctions-lifting/nuclear issue.
We thank Oman and FM @badralbusaidi for their excellent job in hosting and mediating these talks. Oman… pic.twitter.com/P82zHkkckv
— Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) April 12, 2025
तसेच इराणच्या परराष्ट्र णंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, चर्चा अप्रत्यक्षपणे, ओमानच्या मध्यस्थीने होईल, परंतु सध्या भविष्यातील चर्चा कुठे होणार यावर बोलणे सुरु आहे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाकीई यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितली. त्यांनी सांगितले की, या चर्चेत इराणचे लक्ष्य त्यांच्यावरील निर्बंध हटवणे आणि अणु प्रकल्पांवर असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चर्चेपूर्वी धमकी दिला आहे की, अमेरिका इराणशी अणु कार्यक्रमांवर वाटाघाटी करण्यास तयार आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणने आपला अणु प्रकल्प बंद करावा, असे न केल्यास याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. त्यांनी इराणवर बॉम्ब हल्ल्याचीही धमकी दिली आहे.
परंतु इराणच्या अलीकडच्या अधिकृत निवेदनावरुन ही चर्चा अप्रत्यक्षपणे होणार आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे डोनाल्ड ट्रम्प इराणसमोर झुकले अशी अटकळी बांधण्यात येत आहे.