Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगाने पहिली फ्रान्सच्या सुपरसॉनिक ASMPA-R ची पहिली झलक; रशियासोबत तणाव वाढत असतानाच शक्तीप्रदर्शन

France supersonic Cruise : रशियाच्या हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, फ्रान्सने प्रथमच त्यांचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, ASMPA-R, सादर केले आहे. हे क्षेपणास्त्र अणुहल्ला करण्यास अत्यंत सक्षम आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 14, 2025 | 02:34 PM
World gets first glimpse of France's supersonic ASMPA-R show of force as tensions with Russia rise

World gets first glimpse of France's supersonic ASMPA-R show of force as tensions with Russia rise

Follow Us
Close
Follow Us:

1. फ्रान्सने रशियासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अणु-सक्षम सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ASMPA-R प्रथमच सादर केले.

2. या क्षेपणास्त्राची चाचणी फ्रेंच नौदलाच्या राफेल एम लढाऊ विमानातून करण्यात आली, पण त्यात अणु वॉरहेड बसवले गेले नव्हते.

3. ASMPA-R चे रेंज 600 किलोमीटर असून, हे फ्रान्सला शत्रूच्या लक्ष्यांवर दुरून हल्ला करण्यास सक्षम करते, तसेच फ्रान्सची अणु प्रतिबंधक क्षमता मजबूत करते.

France supersonic Cruise : रशियासोबतच्या (Russia) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने आपल्या अणु सामर्थ्याची ताकद वाढवली आहे. फ्रेंच नौदलाने अणु-सक्षम सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ASMPA-R जगासमोर प्रथमच सादर केले आहे. हे क्षेपणास्त्र मुख्यतः फ्रेंच नौदलाच्या राफेल एम लढाऊ विमानांमध्ये तैनात केले गेले असून, अणु हल्ल्याचा सराव करण्यासाठी याचा उपयोग केला गेला आहे. तथापि, या चाचणीमध्ये प्रत्यक्ष अणु वॉरहेड वापरलेले नाहीत.

ऑपरेशन डायोमेडच्या भाग म्हणून या क्षेपणास्त्राचा सराव करण्यात आला. 10 नोव्हेंबरला फ्रेंच संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की ASMPA-R अधिकृतपणे फ्रेंच नौदलाच्या अणु विमान दलात समाविष्ट झाले आहे. या क्षेपणास्त्राला राफेल लढाऊ विमानांद्वारे प्रक्षेपित केले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

ASMPA-R हे क्षेपणास्त्र 2010 पासून विकसित होत आहे आणि 2023 पासून ते कार्यरत आहे. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र फक्त फ्रेंच हवाई दलाच्या स्ट्रॅटेजिक एअर फोर्समध्ये तैनात होते. आता फ्रान्सच्या नौदलाने देखील त्याचा समावेश केला आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांनी 2024 मध्ये ASMPA-R सह उड्डाण करणाऱ्या राफेल जेटचा फोटो जारी केला, जो या क्षेपणास्त्राची प्रतिमा प्रेक्षकांसमोर आणणारा पहिला प्रसंग होता.

फ्रेंच नौदलाचे एकमेव अणु-सक्षम विमानवाहू जहाज चार्ल्स डी गॅले हे अमेरिकेबरोबरच NATO मधील एकमेव जहाज आहे जे अणुबॉम्ब वाहून नेऊ शकते. या जहाजावर राफेल एम विमानांचा समावेश करून अणु क्षेपणास्त्र ASMPA-R तैनात केले गेले आहे. नवीन ASMPA-R क्षेपणास्त्राचे रेंज मागील ASMP-A पेक्षा जास्त आहे आणि याची कमाल वेग मॅक 3 पर्यंत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या क्षेपणास्त्राच्या सुपरसॉनिक वेगामुळे आणि लांब पल्ल्यामुळे फ्रान्स आता शत्रूच्या लक्ष्यावर दूरून यशस्वीरित्या हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र फ्रान्सला शत्रूच्या हल्ल्याच्या रेंजच्या बाहेर राहून विरोधी लक्ष्यांचा नाश करण्याची क्षमता देते. ASMPA-R च्या विकासामागे फ्रान्सची अणु आधुनिकीकरण योजना आणि प्रतिबंधक धोरण मजबूत करण्याचा हेतू आहे.

The French Naval Air Force has successfully conducted a test launch of an ASMPA-R air-launched cruise missile, without its nuclear payload, from a Rafale Marine jet figher operating out of the Landivisiau naval air base🇫🇷.
📸 by Kevin Auger / Marine Nationale pic.twitter.com/jRgkvPu2Vr
— Tom Antonov (@Tom_Antonov) November 13, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RuleOfLaw : पाकिस्तानची न्यायव्यवस्था ढवळून निघाली; 27 व्या घटनादुरुस्तीवर संतापलेल्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा राजीनामा

फ्रान्सने याचबरोबर M51.3 पाणबुडीतून सोडले जाणारे अणु क्षेपणास्त्र देखील विकसित केले आहे, जे फ्रेंच ट्रायओफंट-क्लास अणुवाहक पाणबुड्यांवर तैनात आहे. हे क्षेपणास्त्र देखील युरोपमधील सुरक्षा धोरणाचा भाग आहे, जिथे रशियन हल्ल्याचा धोका अधिक आहे. फ्रान्सने युरोपमधील देशांना अणुबॉम्ब संरक्षण देण्याची ऑफर दिलेली आहे, विशेषतः युक्रेन युद्धानंतर रशियाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा दबाव वाढत असल्याने. फ्रान्सच्या या नव्या क्षेपणास्त्रामुळे युरोपमधील सामरिक संतुलन बदलू शकते. ASMPA-R च्या सुपरसॉनिक वेगामुळे आणि लांब पल्ल्यामुळे फ्रान्स आता शत्रूच्या हद्दीच्या आत न जाऊन त्यांना प्रभावी हल्ला करू शकतो. ही पद्धत फ्रान्सच्या अणु सामर्थ्याची दृढता दर्शवते आणि NATO देशांसमोर त्याची सामरिक ताकद अधोरेखित करते.

Web Title: World gets first glimpse of frances supersonic asmpa r show of force as tensions with russia rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • France
  • International Political news
  • Russia

संबंधित बातम्या

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?
1

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?

Arunachal Pradesh : ‘ही’ India-China संबंधात फूट पडण्याचा चाल; पेंटागॉनच्या अहवालामुळे ड्रॅगन चवताळला
2

Arunachal Pradesh : ‘ही’ India-China संबंधात फूट पडण्याचा चाल; पेंटागॉनच्या अहवालामुळे ड्रॅगन चवताळला

Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप
3

Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप

Bangladesh Crisis : बांगलादेशात माध्यमांची गळचेपी; आता ‘Naznin Munni’ या पत्रकार महिलेवर कट्टरपंथीयांची टांगती तलवार,पण का?
4

Bangladesh Crisis : बांगलादेशात माध्यमांची गळचेपी; आता ‘Naznin Munni’ या पत्रकार महिलेवर कट्टरपंथीयांची टांगती तलवार,पण का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.