
Turkey to Mediate between Russia-Ukraine War
Russia Ukraine War News in Marathi : इस्तंबूल : रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी सुरु असलेले आतापर्यंतचे अनेक आंतरराष्ट्रीय प्रयत्न निष्फळ ठरले आहे. परंतु आता आणखी एक नवी आशा मिळाली आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी शांतता चर्चेस सहमती दिली आहे. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये ही चर्चा होणार आहे. परंतु सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना जमले नाही, ते एर्दोगान करु शकतील का?
रशियाची सरकारी वृत्तसंस्थी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे. हवाल्याने सांगितले आहे की, रशियाने युक्रेनशी शांतता चर्चा पुन्हा सुरु करण्यास होकार दिला आहे. यामुळे तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा होईल. जरी ही चर्चा यशस्वी ठरली तर तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राजकीय पातळीवर एक मोठा विजय असेल.
रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, तुर्की (Turkey) अधिकारी सध्या शांतता चर्चेसाठी तयारी करत आहे. तुर्कीच्या सततच्या आग्रहामुळेच रशियाने चर्चेस सहमती दिली आहे, आता ही चर्चा यशस्वी ठरणे युक्रेनच्या हातात आहे.
आतापर्यंत यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प प्रयत्न करत होते, परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांच्यात अलास्कामध्ये भेट झाली होती. ही भेटही अपयशी ठरली होती. यानंतर रशियाने चर्चेसाठी तयारी दर्शवली होती. यासाठी बुडापेस्टमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची दुसरी बैठक होणार होती. परंतु पुतिन यांच्या चर्चा करणे व्यर्थ असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी ही बैठक रद्द केली होती.
याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) पुतिन यांच्याशी भेटण्यास तयार नाहीत. यामुळे सध्या ही चर्चा यशस्वी ठरणार का नाही याबाबत अनिश्चितता आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची बैठक झाली होती. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्यासमोर पुतिन यांचा मॉस्को भेटीचा एक प्रस्ताव मांडला होता. पण तो प्रस्तावर झेलेन्स्कींनी नकार दिला होता.
सध्या तुर्कीमध्ये होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाही. रशियाने सध्या युक्रेनच्या अनेक प्रदेशांवर ताबा मिळवला आहे. यामुळे यावरुन दोन्ही देशात वाद सुरु आहे. उरलेले प्रदेश वाचवण्याचा युक्रेनचा प्रयत्न सुरु आहे.
Ans: गेल्या चार वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे.
Ans: तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा होणार आहे.
Ans: रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, तुर्की अधिकारी सध्या शांतता चर्चेसाठी तयारी करत आहे. तुर्कीच्या सततच्या आग्रहामुळेच रशियाने चर्चेस सहमती दिली आहे, आता ही चर्चा यशस्वी ठरणे युक्रेनच्या हातात आहे.