Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UNGA : संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाने भारताच्या विरोधात का केले मतदान? पाकिस्तानला दिला पाठिंबा; जाणून घ्या ‘या’ 5 मुद्द्यांमध्ये

UNGA : संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि बेलारूसच्या शस्त्र नियंत्रण ठरावाला 180 देशांनी पाठिंबा दिला. भारत आणि इस्रायलने याला विरोध केला, तर रशिया, अमेरिका आणि चीनने याचे समर्थन केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 05, 2026 | 10:53 AM
Russia votes against India UN Pakistan Belarus UN resolution

Russia votes against India UN Pakistan Belarus UN resolution

Follow Us
Follow Us:
  • संयुक्त राष्ट्रांत भारताचा ठाम विरोध
  • रशिया आणि अमेरिकेचा पाठिंबा
  • भारताची भूमिका आणि आक्षेप

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) पहिल्या समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मतदानाने जागतिक मुत्सद्देगिरीत मोठे वादळ निर्माण केले आहे. पाकिस्तान आणि बेलारूस यांनी संयुक्तपणे मांडलेल्या ‘प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक स्तरावर पारंपरिक शस्त्र नियंत्रण’ या ठरावाच्या बाजूने तब्बल १८० देशांनी मतदान केले. या प्रस्तावाला भारताने आणि इस्रायलने कठोर विरोध दर्शवत विरोधात मतदान केले. मात्र, सर्वात जास्त चर्चा रंगली ती भारताचा दीर्घकालीन सामरिक भागीदार असलेल्या रशियाच्या भूमिकेची. रशियाने अमेरिका आणि चीनसोबत जात या ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची सुरक्षा चिंतेची भूमिका आणि रशियाचे धोरण यावरून नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाकिस्तान आणि बेलारूसच्या ठरावात नक्की काय होते?

संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या समितीमध्ये ‘प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक स्तरावर पारंपरिक शस्त्र नियंत्रण’ नावाचा एक मसुदा सादर करण्यात आला होता. १९३ सदस्य देश असलेल्या या समितीमध्ये पाकिस्तान-बेलारूस प्रस्तावाला १८० देशांचे समर्थन मिळाले. या मतदानात कोणताही देश तटस्थ राहिला नाही. पाकिस्तानने या परिणामाचे वर्णन स्वतःचा मोठा राजनैतिक विजय म्हणून केले.

या प्रस्तावाअंतर्गत, संयुक्त राष्ट्र निःशस्त्रीकरण आयोगाने (UN Disarmament Commission) प्रादेशिक पातळीवर पारंपरिक शस्त्रांचे नियंत्रण करण्यासाठी नवीन तत्त्वे आणि कायदेशीर आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली होती. प्रादेशिक लष्करी संतुलन राखणे आणि शेजारील देशांमधील शस्त्रस्पर्धेवर मर्यादा आणणे हा या ठरावाचा मुख्य उद्देश असल्याचा दावा पाकिस्तानने केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump : मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रम्प यांची पलटी! इस्रायलची 4 अब्ज डॉलरची मदत रोखली, तर इराणबाबतही बदलली भूमिका

 भारताने या प्रस्तावाला का विरोध केला?

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनमोल शेर बेदी यांनी भारताच्या विरोधामागची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड शब्दांत मांडली. भारताच्या मते, पारंपरिक शस्त्र नियंत्रण (Conventional Arms Control) हा संपूर्ण जगाशी संबंधित असलेला व्यापक मुद्दा आहे. त्यामुळे त्याचे निवारण प्रादेशिक किंवा उप-प्रादेशिक चौकटीत बंदिस्त करून करता येणार नाही.

१. पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांची पुनरावृत्ती कशासाठी?

भारताने उपस्थित केलेला पहिला प्रमुख मुद्दा म्हणजे निःशस्त्रीकरण आयोगाची पूर्वइतिहास. संयुक्त राष्ट्र निःशस्त्रीकरण आयोगाने याआधीच तीन वेळा सर्वसंमतीने या विषयावर मार्गदर्शक तत्त्वे आणि शिफारसी मंजूर केलेल्या आहेत:

  • १९९३: प्रादेशिक निःशस्त्रीकरणावरील मार्गदर्शक तत्त्वे.
  • १९९९: पारंपरिक शस्त्र नियंत्रण आणि निःशस्त्रीकरणावरील मार्गदर्शक तत्त्वे.
  • २०१७: पारंपरिक शस्त्रांच्या संदर्भातील व्यावहारिक विश्वास-निर्मिती उपाय (Confidence-Building Measures).

अनमोल शेर बेदी यांनी प्रश्न विचारला की, जेव्हा या विषयावर आधीच तीन वेळा सर्वसमावेशक निष्कर्ष निघालेले आहेत, तेव्हा पुन्हा नवीन आराखडा तयार करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे? आधीच झालेल्या चर्चेवर पुन्हा चर्चा करणे वेळेचा अपव्यय ठरेल, असा युक्तिवाद भारताने केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : ‘We Will Kill Trump…’ट्रम्प यांच्या पराभवावर इराणच्या राजधानित झळकले वादग्रस्त होर्डिंग्ज; पाहा VIDEO

२. सुरक्षेच्या गरजा भौगोलिक सीमांपुरत्या मर्यादित नसतात

भारताचा दुसरा महत्त्वाचा आक्षेप प्रादेशिक लष्करी समीकरणांवर होता. अनमोल शेर बेदी म्हणाल्या, “कोणत्याही देशाची सुरक्षा आव्हाने ही केवळ त्याच्या शेजारील सीमा किंवा ठरविक प्रदेशापुरती मर्यादित नसतात. लष्करी क्षमता, जागतिक सामरिक हितसंबंध आणि सुरक्षा धोके हे प्रादेशिक सीमांच्या पलीकडे विस्तारलेले असतात.” त्यामुळे एखाद्या विशिष्ट प्रादेशिक चौकटीत ‘लष्करी संतुलन’ राखण्याची संकल्पना व्यावहारिक आणि वास्तववादी वाटत नाही, असे भारताने ठणकावून सांगितले.

#Bangladesh Amb. @hamidullah_riaz presented his Credentials to Amb. Tahir Hussain Andrabi, the President of the Conference on Disarmament (CD) in Geneva [#Pakistan Permanent Representative] today. They reflected on the CD’s functioning. #ConferenceOnDisarmament #Disarmament #Multilateralism #ArmsControl #InternationalSecurity
@BDMOFA @UNGeneva @PakUN_Geneva @ForeignOfficePk
— Permanent Mission of Bangladesh, Geneva (@BDPM_Geneva) November 2, 2026

credit – social media and Twitter

 रशियाने भारताच्या विरोधात जाऊन का मतदान केले?

या मतदानात भारताचा अत्यंत विश्वासू मित्र मानल्या जाणाऱ्या रशियाने पाकिस्तान-पुरस्कृत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या. मात्र, मुत्सद्देगिरीच्या चौकटीत रशियाची ही भूमिका थेट भारताच्या विरोधात नसून त्यांच्या स्वतःच्या जागतिक धोरणाचा भाग मानली जाते:

१. बहुपक्षीय निःशस्त्रीकरण धोरण: रशिया हा संयुक्त राष्ट्रांच्या निःशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रणाच्या सार्वत्रिक प्रक्रियेचा नेहमीच समर्थक राहिला आहे. पारंपरिक शस्त्र नियंत्रणाच्या जागतिक चौकटीला पाठिंबा देणे हे रशियाच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे.

२. जागतिक महासत्तांचे एकमत: केवळ रशियाच नव्हे तर अमेरिका आणि चीन या महासत्तांनीही या प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. बहुतांश जागतिक शक्ती प्रादेशिक स्तरावरील शस्त्र नियंत्रण करारांना तत्त्वतः पाठिंबा देतात.

३. द्विपक्षीय संबंधांवर परिणाम नाही: रशियाच्या या मतदानामुळे भारत-रशिया सामरिक संबंधांवर थेट विपरीत परिणाम होणार नाही, कारण रशियाने हे मतदान आपल्या बहुपक्षीय (Multilateral) धोरणानुसार केले आहे, भारताला शह देण्यासाठी नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानने कोणता ठराव मांडला होता?

    Ans: पाकिस्तान आणि बेलारूसने संयुक्तपणे 'प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक स्तरावर पारंपरिक शस्त्र नियंत्रण' हा ठराव मांडला होता.

  • Que: या प्रस्तावाच्या विरोधात कोणत्या देशांनी मतदान केले?

    Ans: या प्रस्तावाच्या विरोधात केवळ भारत आणि इस्रायल या दोन देशांनी मतदान केले.

  • Que: भारताने पाकिस्तानच्या शस्त्र नियंत्रण प्रस्तावाला विरोध का केला?

    Ans: पारंपरिक शस्त्र नियंत्रण हा जागतिक मुद्दा आहे आणि देशांच्या सुरक्षेच्या गरजा केवळ प्रादेशिक सीमांपुरत्या मर्यादित नसतात, या कारणास्तव भारताने विरोध केला.

Web Title: Unga russia vote against india pakistan arms control resolution hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Russia
  • United Nations Security Council
  • World news

संबंधित बातम्या

Dubai : ऑफिसच्या चार भिंतींना बाय-बाय! दुबईत सुरू झाले पहिले ‘वर्क फ्रॉम पार्क’; जाणून घ्या नक्की कशी आहे सिस्टीम?
1

Dubai : ऑफिसच्या चार भिंतींना बाय-बाय! दुबईत सुरू झाले पहिले ‘वर्क फ्रॉम पार्क’; जाणून घ्या नक्की कशी आहे सिस्टीम?

US Midterms : ट्रम्प यांच्या पराभवाचा भारताला फायदा की तोटा? व्यापार, व्हिसा अन् काश्मीरवरून नवा पेच
2

US Midterms : ट्रम्प यांच्या पराभवाचा भारताला फायदा की तोटा? व्यापार, व्हिसा अन् काश्मीरवरून नवा पेच

US Midterms : ‘We Will Kill Trump…’ट्रम्प यांच्या पराभवावर इराणच्या राजधानित झळकले वादग्रस्त होर्डिंग्ज; पाहा VIDEO
3

US Midterms : ‘We Will Kill Trump…’ट्रम्प यांच्या पराभवावर इराणच्या राजधानित झळकले वादग्रस्त होर्डिंग्ज; पाहा VIDEO

Donald Trump : मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रम्प यांची पलटी! इस्रायलची 4 अब्ज डॉलरची मदत रोखली, तर इराणबाबतही बदलली भूमिका
4

Donald Trump : मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रम्प यांची पलटी! इस्रायलची 4 अब्ज डॉलरची मदत रोखली, तर इराणबाबतही बदलली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.