Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांच्या जनतेसमोर न येण्याने देशात प्रचंड गोंधळ उडाला आहे. खामेनेई नक्की कुठे गायब आहेत असा प्रश्न केला जात आहे. याबाबात इराणच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 03:10 PM
Mojtaba Khamenei

Mojtaba Khamenei

Follow Us
Follow Us:
  • कुठे गेले इराणचे नवे सुप्रीम लीडर?
  • अमेरिकी हवाई हल्ल्यात जखमी असल्याचा दावा?
  • इराणने स्पष्टचं सांगितलं
Iran Political Crisis : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर लष्करी हल्ला केला होता. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेईंचा मृत्यू झाला. यामुळे इराणमध्ये राजकीय गोंधळ उडाला होता. तसेच इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आक्रमक होऊन अमेरिका-इस्रायल विरोधात युद्ध पुकारले होते. दरम्यान यानंतर इराणच्या नव्या सुप्रीम लीडरची नियुक्तही करण्यात आली होती. खामेनेईच्या मुलगा मोजतबा खामेनेईच इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवडून आले होते.

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल

कुठे आहेत मोजतबा खामेनेई?

पण सध्या मोजतबा खामेनेई गायब असल्याने खळबळ उडाली आहे. मोजतबा खामेनेई नेमकं कुठे आहेत, त्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला का अशा चर्चा सुरु आहेत. कारण २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर मोजतबा खामेनेई सार्वजनिकरित्या कुठेच दिसले नाही. नुकत्याच समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार, मोजतबा खामेनेई हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी याची अधिकृत पुष्टी केली आहे.

खामेनेईंचे संपूर्ण कुटुंब हल्ल्यात ठार

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोजतबा खामेनेई यांची आई आणि त्यांची पत्नी देखील ठार झाली असल्याचे वृत्त आहे. सायप्रयास मधील इराणचे राजदूत अलीरेजा सालारियन यांनी याची पुष्टी केली आहे. मोजतबा देखील हल्ल्यावेळी घटनस्थळी उपस्थित होते, परंतु या हल्ल्यातून ते बचावले असल्याचे अलीरेजा यांनी म्हटले आहे. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बंकरमधूनच पाहता आहेत देशाचा कारभार

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा खामेनेई शुद्धवर असून सध्या ते एका सुरक्षित आणि गुप्त बंकरमध्ये आहेत. त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहेत. येथूनचे ते महत्वाच्या आणि मर्यादित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून देशाचा कारभार चालवत असल्याचे म्हटले जात आहे.

काही प्रशासयकी जबाबदाऱ्या महत्वाच्या व्यक्तींकडे सोपवण्यात आल्या आहेत. सध्या इराणमध्ये मोजतबा खामेनेई यांच्या सर्वोच्च नेतेपदी निवडीमुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. राजेशीही समर्थकांनी याला तीव्र विरोध केला आहे. परंतु त्यांच्या समर्थकांकडून त्यांना पाठिंबाही मिळत आहे.

ट्रम्प यांची धमकी

दरम्यान याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोजतबा यांच्या निवडीवर आधीच कडक शब्दांत टीकाही केली होती. तसेच त्यांनी आणि इस्रायलनेही कोणत्याही नव्या नेत्याला सत्तेत टिकून देणार नाही, त्यांचाही खात्मा करु अशी धमकी दिली होती.

India Oil Diplomacy : जयशंकर यांचा मास्टरस्ट्रोक! इराणने फक्त भारतासाठीच खुले केले तेल दरवाजे; अमेरिका बघतच राहिली

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई कसे जखमी झाले?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे नवे सुप्रीम लीडर अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला बॉम्बस्फोटांच्या धक्क्यांमुळे गंभीर दुखापत झाल्याचे इराणने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.

  • Que: सध्या मोजतबा खामेनेई कुठे आहेत?

    Ans: सुरक्षेच्या कारणास्तव मोजतबा खामेनेई सध्या एका गुप्त आणि सुरक्षित बंकरमध्ये असल्याची माहिती ईराणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • Que: सध्या इराणची राजकीय परिस्थिती कशी आहे?

    Ans: सध्या इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. सैन्य आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी नव्या सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांना पाठिंबा दिला आहे, तर काही ठिकाणी विरोध होत आहे.

Web Title: Middle east war irans new supreme leader mojtaba khamenei injured but safe say officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Maritime Rescue : भारतीय जहाज ‘Virat1’ जलमय, 14 खलाशांचे प्राण थोडक्यात वाचले; अमेरिकन नौदल धावून आले मदतीला
1

Maritime Rescue : भारतीय जहाज ‘Virat1’ जलमय, 14 खलाशांचे प्राण थोडक्यात वाचले; अमेरिकन नौदल धावून आले मदतीला

MT Celestial : पाण्याच्या थंड बाटल्या अन मृतदेह! युद्धाच्या आगीत ओमान बंदरातील ‘त्या’ जहाजावरील थरकाप उडवणारी भीषण वास्तवता
2

MT Celestial : पाण्याच्या थंड बाटल्या अन मृतदेह! युद्धाच्या आगीत ओमान बंदरातील ‘त्या’ जहाजावरील थरकाप उडवणारी भीषण वास्तवता

Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोला विषाणूचा झपाट्याने प्रसार; मृतांचा आकडा १०० पार, WHO कडून गंभीर इशारा
3

Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोला विषाणूचा झपाट्याने प्रसार; मृतांचा आकडा १०० पार, WHO कडून गंभीर इशारा

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ नाकेबंदीचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही’ भारताच्या नाराजीवर US परराष्ट्र सचिव रुबियो यांचे वक्तव्य
4

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ नाकेबंदीचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही’ भारताच्या नाराजीवर US परराष्ट्र सचिव रुबियो यांचे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.