Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल

Global Oil Crisis : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर मोठे तेल आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली आहे. याच वेळी भारताला यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 12:51 PM
Global Oil Crisis

Global Oil Crisis

Follow Us
Follow Us:
  • इराणने होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी केली खुली
  • अनेक देश अजूनही संकटात
  • जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेची परिस्थिती
Global Oil Crisis : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel Iran War) जागतिक स्तरावर मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर पाळत ठेवली असून या मार्गावरुन जाणाऱ्या अमेरिका-इस्रायलच्या तेल जहाजांना लक्ष्य केले जात आहे.  यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने तेलाच्या किंमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. भारताला मात्र यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.

India Oil Diplomacy : जयशंकर यांचा मास्टरस्ट्रोक! इराणने फक्त भारतासाठीच खुले केले तेल दरवाजे; अमेरिका बघतच राहिली

भारताला तेल संकटातून दिलासा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मंगळवारी (१० मार्च २०२६) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले होते. या वेळी भारताने आपल्या व्यापारी हितसंबंधाच्या आणि उर्जा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेनंतर इराणने भारताच्या भूमिकेचा आदर करत, भारतीय झेंड असलेल्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली.

इराणने दिलेल्या परवानगीमुळे ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे दोन भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे. शिवाय भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने पर्यायी पुरवठा साखळी इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. परंतु जागतिक तुटवडा पाहता भविष्यता तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यात आहेच.

हे देश अद्यापही तेल संकटात

  • सध्या इराणने अमेरिका-इस्रायल(Israel)सह युरोपीय देशांसाठी देखील होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली यांसारखे अनेक युरोपीय देश तेल संकटात अडकले आहेत.
  • याशिवाय भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि श्रीलंकाही तेल संकटामुळे डबघाईला आला आहे.
  • याच वेळी जगातील सर्वात मोठा निर्यातदार अरब देश सौदी अरेबिया(Saudi Arabia)ला सध्या जागतिक बाजारात तेल पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. परंतु सौदीने सध्या पेट्रोलाईन East-West पाइपलाइन सुरु केल्याने काही प्रमाणात तेल जागतिक बाजारपेठेत पोहचवत आहे.
  • UAE तील अबु धाबी आणि दुबईतून होणारी तेल निर्यात या सामुद्रधुनीतून होते. पण यूएईने देखील अबू धाबी ते फुजैरा पर्यायी पाईपलाईन विकसित केली आहे.
  • कुवैतचा १००% तेल व्यापार याच मार्गावरुन चालतो. हा मार्ग बंद झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
  • कतार हा जगातील सर्वात मोठा LNG गॅस वायूचा निर्यातदार आहे. पण होर्मुझ मार्ग बंद झाल्याने जागितक बाजारात गॅसचे संकट निर्माण झाले आहे. इराकमधून येणारे तेलही थांबले आहे.

अमेरिका-इस्रायलची स्थिती

तर दुसरीकडे अमेरिका(America)-इस्रायलसाठी ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक बनली आहे. अमेरिका जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक आणि निर्यातदार आहे. परंतु अमेरिकेने अनेक तेल टँकर्स होमुर्झमध्ये अडकल्याने देशातील गॅसोलीनच्या किमती १४% वाढल्या आहेत, तर कच्चा तेलाचे दरही ९०डॉलरच्या पार गेले आहेत.  याशिवाय इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलने गॅस उत्पादन आणि निर्यात तात्पुरती थांबवली आहे. यामुळे शेजारील देशांमध्ये पुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्यपूर्वेतील युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहे.

Web Title: Global oil crisis india relief us israel energy pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • crude oil
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

PoK Protests: सत्य दाबण्यासाठी पाक लष्कराची दडपशाही; ‘Al Jazeera’सह अनेक डिजिटल न्यूज पोर्टल्स ब्लॉक
1

PoK Protests: सत्य दाबण्यासाठी पाक लष्कराची दडपशाही; ‘Al Jazeera’सह अनेक डिजिटल न्यूज पोर्टल्स ब्लॉक

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी
2

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी

Earthquake: इजिप्त आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; सुएझ शहरात 5.4 तीव्रतेचा थरार, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी
3

Earthquake: इजिप्त आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; सुएझ शहरात 5.4 तीव्रतेचा थरार, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

War Crimes: रशियाचा झापोरिझियावर विनाशकारी ग्लाइड बॉम्ब हल्ला; बहुमजली इमारत उद्ध्वस्त, 1 महिला ठार, 31 नागरिक गंभीर जखमी
4

War Crimes: रशियाचा झापोरिझियावर विनाशकारी ग्लाइड बॉम्ब हल्ला; बहुमजली इमारत उद्ध्वस्त, 1 महिला ठार, 31 नागरिक गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.