
फोटो सौजन्य AI
फक्त आणि फक्त ते पॅलेस्टानी आहेत म्हणून त्यांचा जीव गेला आहे . या हल्ल्यामुळे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्तच गाझा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे . त्याचबरोबर त्याला पूर्णपणे बंधिस्त करून बाहेरच्या जगातून मिळणारी मदत देखील अडवण्यात आली आहे . भुकेमुळे सुद्धा लोकं यात मरण पावली आहेत .
Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
या सगळ्याला जेवढा हमास जबाबदार आहे तेवढाच इस्रायल जबाबदार आहे . कारण कोणालाही किंवा कोणत्याही देशाच्या सरकारला निष्पाप नागरिकांचा , महिलांचा , लहानमुलांचा तसेच निशस्त्र असलेल्या आणि प्रतिकार करू न शकणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचा अधिकार नाही .
या सगळ्या हिंसाचारामुळे नेतन्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट ने अटक वॊरंट जाहीर केले आहे . अश्यातच इटलीच्या राजधानी रोम मधून ख्रिस्ती धर्मगुरूंनी लहानमुलांसोबत झालेल्या हिंसाचाराविरोधात मोर्चा काढून आपली सहानभूती आणि पाठिंबा दर्शवणं कौतुकास्पद आहे . असे बोलले जात आहे .
इटलीची राजधानी रोममध्ये ‘Priests Against Genocide’ या गटाने आयोजित केलेल्या निदर्शनात सुमारे ३०० मुलांची नावे लिहिलेले पांढरे दफनवस्त्र नेण्यात आले. या प्रतीकातून गाझा, व्याप्त वेस्ट बँक आणि लेबनॉनमधील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Iran–US War : ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
निदर्शनात सहभागी धर्मगुरू, नन्स आणि इतर कार्यकर्त्यांनी हे मोठे पांढरे वस्त्र हातात घेतले होते. त्यावर मुलांची नावे लिहिण्यात आली होती. आयोजकांच्या मते, युद्धातील मृत्यू केवळ आकडे नसून प्रत्येक मृत व्यक्तीची एक ओळख आणि कुटुंब आहे, हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला.
या आंदोलनातून गाझासह मध्यपूर्वेतील युद्ध, नागरिकांचा मृत्यू आणि शस्त्रांच्या वापराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. सहभागी धर्मगुरूंनी शांतता आणि नागरिकांच्या संरक्षणाची मागणी केली. युद्धविरामाच्या काळातही हिंसाचार सुरू राहिल्याचा दावा करत त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले.