World on brink of war 27 countries on alert 450 million at risk
ब्रसेल्स : युरोपमध्ये तृतीय महायुद्ध होण्याच्या भीतीने वातावरण ढवळून निघाले आहे. युरोपियन युनियन (EU) आणि नाटो ने त्यांच्या सदस्य देशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य संघर्षाला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे. विशेषतः रशियाची २०३० पर्यंत युरोपवर हल्ला करण्याची क्षमता वाढेल, असा इशारा नाटो महासचिव मार्क रूट यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर युरोपातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
युरोपियन युनियनने आपल्या ४५ कोटी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, ते कोणत्याही स्थितीसाठी तयार राहावेत. लोकांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा, ज्यामध्ये किमान ७२ तास पुरेल एवढे अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू असाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. युरोपच्या सुरक्षेबाबत आता नाटो सदस्य देश अधिक गहिराईने विचार करत असून, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडसह अनेक देश युद्धाच्या तयारीत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल सर्वात धोकादायक, डोळ्यांनी पाहणे कठीण; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
युरोपमधील काही शहरांवर रशियाकडून मिसाइल हल्ल्यांचे सावट निर्माण झाले आहे. युक्रेनच्या सुमी शहरावर रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, त्यानंतर युरोपियन युनियनने आपल्या रणनीतीचा आढावा घेतला. नाटो महासचिव मार्क रूट यांनी वारसॉ येथे बोलताना रशियाला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “जर कोणाला वाटत असेल की पोलंड किंवा इतर देशांवर हल्ला करून नाटोला कमजोर करता येईल, तर त्यांना नाटोच्या संपूर्ण सामर्थ्याचा सामना करावा लागेल. आमची प्रतिक्रिया अत्यंत विध्वंसक असेल.” रशियाने युरोपला मोठ्या संकटात टाकले असून, नाटोच्या प्रमुख देशांनी आपल्या सैन्य आणि संरक्षण क्षमतांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.
युरोपियन युनियनमधील संरक्षण आणि संकट व्यवस्थापन तज्ज्ञ हादजा लाहबीब यांनी सांगितले की, “युरोप समोरील धोके आधीपेक्षा अधिक जटिल झाले आहेत. नाटो प्रमुखांनी आधीच इशारा दिला आहे की रशियाची युद्धसज्जता प्रचंड वाढली आहे.” नाटो महासचिव मार्क रूट म्हणाले, “आपण हे विसरू नये की रशिया आमच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे आणि पुढेही राहील. रशिया आता युद्धकालीन अर्थव्यवस्थेकडे झुकत आहे आणि थेट आपली सैन्य क्षमता वाढवत आहे.”
रशियाने जपान समुद्रात ‘उफा’ अटॅक सबमरीनमधून क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. रशियन सरकारी माध्यमांच्या मते, या क्षेपणास्त्रांनी खाबरोवस्क क्षेत्रातील ६२० मैल दूर असलेल्या जमिनीवरील लक्ष्य आणि नौदलाच्या तळांना यशस्वीपणे भेदले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “रशियावर आणि त्यांच्या रणनीतींवर आमचा कोणताही विश्वास नाही. जगाला हे स्पष्टपणे समजले पाहिजे की, चर्चेचा दिवस असो वा युद्धाचा, रशिया नेहमीच आपली फसवणूक सुरू ठेवतो.”
नाटोच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत रशिया युरोपवर थेट हल्ला करू शकतो, त्यामुळे नाटो देशांनी आपल्या सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करायला सुरुवात केली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडने आपल्या सैन्य दलाची ताकद वाढवण्याचे ठरवले आहे. याशिवाय, सामान्य नागरिकांनीही युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्ज रहावे, असा इशारा युरोपियन युनियनने दिला आहे. अन्न, पाणी आणि औषधांचा साठा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : France Poker 2025 : फ्रान्स युद्धासाठी सज्ज! काय आहे लष्कराचा पोकर 2025?
रशियाच्या वाढत्या आक्रमक धोरणामुळे युरोप आता तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत पोहोचला आहे. युरोपियन युनियन आणि नाटोने सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तथापि, रशिया आपल्या लष्करी तयारीत कोणतीही शिथिलता देत नाही. त्यामुळे युरोपमधील तणाव वाढत चालला असून, भविष्यात युद्ध टाळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.