
फोटो सौजन्य AI
नेतान्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले कि , न्यू यॉर्कचे महापौर ममदानी हे द्वेष पसरवत आहेत . कारण गाझा पट्टीतील युद्धात केलेल्या कारवाईमुळे त्यांना गुन्हेगार ठरवले असून ममदानी वारंवार नेतन्याहू यांचा उल्लेख युद्ध गुन्हेगार करत आहेत . संयुक्त राष्ट्र सभेच्या आमसभा यावेळी न्यू यॉर्क शहरात होत असून नेतन्याहू सभेसाठी आल्यास त्यांना अटक केली जावी असे त्यांनी म्हंटले आहे .
न्यू यॉर्कचे महापौर नेतन्याहू यांचे स्वागत करण्यास अजिबात उत्सुक नसताना . सप्टेंबर मध्ये जागतिक नेत्यांच्या वार्षिक संयुक्त राष्ट्र परिषदेला संबोधित करण्यासाठी आपण जाणार असल्याचे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे . ममदानी यांनी म्हंटले आहे कि ,जरी न्यू यॉर्क शहराकडे जागतिक गुन्हे न्यायालयाने जारी केलेल्या गुन्हेगारांना पकडण्याचे अधिकार नसले तरी ते केंद्र सरकारला नेतन्याहू यांना अटक करण्यासाठी प्रोत्साहित करतील .
ChinaCyclone: चीनमध्ये ‘नौल’ चक्रीवादळाचा कहर; लाखो नागरिक सुरक्षितस्थळी, शेकडो उड्डाणे रद्द
ट्रम्प यांनी सोमवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे नेतान्याहू यांना सांगितले की, अमेरिकेत असताना त्यांना कोणत्याही प्रकारे अटक केली जाणार नाही. ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी आणि दक्षिण कॅरोलिनाचे दिवंगत रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नेतान्याहू या आठवड्यात वॉशिंग्टनला येणार आहेत. संरक्षणविषयक कठोर धोरणांचे पुरस्कर्ते आणि इस्रायलचे खंदे समर्थक असलेले ग्रॅहम यांचे दोन आठवड्यांपूर्वी हृदयधमनी फाटल्यामुळे अचानक निधन झाले. पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन “असाधारण अमेरिकन देशभक्त” असे केले.