फोटो सौजन्य सोशल मीडिया
चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतासह हाँगकाँग परिसरात ‘नौल’ (Typhoon Noul) या शक्तिशाली चक्रीवादळाने रविवारी मोठा कहर केला. यावर्षी चीनला धडकलेले हे सर्वात तीव्र चक्रीवादळ मानले जात असून, प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्थलांतर मोहीम राबवली आहे.
Indian Navy : भारतीय नौदलाची महासत्ता बनण्याची तयारी; चीन-पाकिस्तानपेक्षा किती ताकदवान?
चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस, ताशी वेगवान वारे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्वांगडोंग प्रांतातून ७ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून काही वृत्तांनुसार हा आकडा ८ लाखांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये शाळा, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
Breaking News : ड्रॅगन मोठी ताकद , दिल्ली सोबत दोस्ती हवी : माजी विदेश मंत्री अमेरिका ..
हाँगकाँगमध्ये चक्रीवादळाचा मोठा परिणाम विमान वाहतुकीवर झाला. सुमारे ३५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली किंवा त्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. अनेक रेल्वे आणि फेरी सेवा देखील तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
चीनच्या हवामान विभागाने मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येण्याचा रेड अलर्ट जारी केला आहे. पर्वतीय भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढल्याने स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडल्यानंतर त्याची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी दक्षिण चीनमध्ये पुढील काही दिवस अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा धोका कायम राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना अधिकृत सूचना पाळण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे






