
फोटो सौजन्य सोशल मीडिया
मात्र निवडणुकीच्या प्राथमिक निकालांमध्ये कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही . त्यामुळे इस्राईलमध्ये आता सरकार कोण स्थापन करणार याबाबत अजूनही काहीच ठरलेले नाही . नेतान्याहू यांनी आपण अरब पार्टीचा पाठिंबा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे . तसेच या निवडणुकीत त्यांच्यासोबत धोकाधडी झाल्याचे नेतान्याहू यांचे म्हणणे आहे .
म्हणजेच निवडणूक पारदर्शक झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे . सगळ्यामुळे इस्रायल मधील सत्तासंघर्ष आता कोणत्या वळणावर जाणार आहे . यावरून जागतिक राजकारणात काय फरक पडणार आहे , याकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे .
इस्रायलमध्ये २७ ऑक्टोबर या दिवशी मतदान बॅलेट पेपरवर पार पडले . २०२३ मधील हमासच्या हल्ल्यानंतर देशात झालेली ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे . या निवडणुकीत नेतान्याहू यांना सुरक्षा धोरण , युद्ध आणि सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी लक्ष केले .
गादी आयझेनकोट यांनी बदलाची हाक देत मतदारांना आकर्षित केले . सुरवातीला विरोधी आघाडीला किंचित आघाडी मिळाल्याचे संकेत मिळाले मात्र , मतमोजणी सुरु झाल्यानंतर चित्र बदलले आणि नेतान्याहू यांच्या आघाडीने आघाडी घेतली . पण त्याचा टक्का जास्त नसल्याने दोन्ही गटात जास्त अंतर नसल्याने काटे की टक्कर निर्माण झाली .
Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
इस्रायलच्या संसदेत म्हणजेच नेसेटमध्ये एकूण १२० जागा आहेत . सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ जागांचे बहुमत आवश्यक आहे . प्राथमिक मतमोजणीत नेतान्याहू यांच्या आघाडीला ५६ तर आयझेनकोट यांच्या विरोधी आघाडीला ४८ जागा मिळण्याचे चित्र होते . अरब पक्षांच्या वाट्याला १६ जागा येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . त्यामुळे सरकार स्थापनेत अरब पक्षांची भूमिका महत्वाची ठरू शकते . यामुळे कोणत्या पक्षाने कोणाला पाठिंबा द्यायचा यावर सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे .
Microsoft News : मायक्रोसॉफ्टमध्ये मोठा बदल! ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी एक्झिट पॅकेज
निवडणुकीमध्ये कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आता विविध पक्षांमध्ये चर्चा आणि आघाड्यांची जुळवाजुळव सुरु होण्याची शक्यता आहे . राष्ट्राध्यक्ष आयझॅक हझान्ग यांच्यावर सरकार स्थापनेसाठी योग्य नेत्याला संधी देण्याची जबादारी असेल . तर दुसरीकडे नेतान्याहू यांनी मजबूत उजव्या विचारसरणीचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . विरोधकांनाही सत्ता स्थापनेचा दावा कायम ठेवला आहे . त्यामुळे आगामी काही दिवस इस्रायलच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत . अंतिम निकाल आणि आघाड्यांच्या चर्चेनंतर देशाचे पुढील नेतृत्व स्पष्ट होईल .