Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगाच्या इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध महामारी; 14 व्या शतकात तीन खंडांमध्ये झाला होता विध्वंस

पाच वर्षापूर्वी 2020 मध्ये कोरोना नावाच्या साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. या महामारीमध्ये लाखो लोकांचा बळी गेला. आता या महामारीनंतर पुन्हा एकदा 2025 मध्ये चीनमधून आणखी एक नवीन विषाणू उद्भवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2025 | 07:20 PM
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम

Follow Us
Close
Follow Us:

पाच वर्षापूर्वी 2020 मध्ये कोरोना नावाच्या साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. या महामारीमध्ये लाखो लोकांचा बळी गेला. याचा उगम चीनच्या वुहान शहरातून झाला होता. काळात सर्व लॉकडाऊन करण्यात आला होते. आता या महामारीनंतर पुन्हा एकदा 2025 मध्ये चीनमधून आणखी एक नवीन विषाणू उद्भवला आहे. याला HMVP म्हणून ओळखले जात आहे. अद्याप यामुळे कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही. मात्र, याची काही प्रकरणे भारतातही नोंदवण्यात आली असून याबाबत काळजी घेण्याचे संकेत जारी केले आहे.

पण तुम्हाला माहिती आहे एक अशी महामारी आहे जीने तीन खंडांमध्ये विध्वंस घडवून आणला होता. 14व्या शतकातील ‘ब्लॅक डेथ’ ही मानव इतिहासातील सर्वात विनाशकारी महामारींपैकी एक मानली जाते. या प्लेगने 75 दशलक्ष ते 200 दशलक्ष लोकांचा बळी घेतला. यामुळे संपूर्ण युरोप, आशिया आणि आफ्रिका मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले. ही महामारी प्रामुख्याने यर्सिनिया पेस्टिस नावाच्या बॅक्टेरियामुळे झाली होती, जी चिलट आणि उंदीर यांच्या माध्यमातून पसरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या विजयावर लागली मोहर; उपराष्ट्रपती हॅरिस यांनी केले अधिकृतपणे घोषित

महामारीची सुरुवात आणि प्रसार

या ब्लॅक डेथची सुरुवात आशियातून झाली असे मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापार मार्गांमुळे, विशेषतः सिल्क रोड आणि समुद्री मार्गांनी, रोगाने आशिया, मध्य पूर्व, युरोप आणि आफ्रिकेतील लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर बाधित केले. 1347 साली 12 जहाजे सिसिलीच्या मेसिना बंदरात आली, ज्यावर बहुतेक खलाशी मृत किंवा गंभीरपणे आजारी होते. जहाजांवर मोठ्या प्रमाणावर काळ्या फोडांनी व्यापलेले मृतदेह होते, ज्यातून रक्त आणि पू बाहेर येत असे. या दृश्याने लोक भयभीत झाले, पण तोपर्यंत रोगाने आपला कहर सुरू केला होता.

महामारीची लक्षणे आणि मृत्यूदर

ब्लॅक डेथचे लक्षणे अत्यंत भीषण होती. ब्यूबोनिक प्लेग, जो या महामारीचा सर्वात सामान्य प्रकार होता, तो लसीका प्रणालीवर परिणाम करीत असे. यामुळे अंगावर फोड यायचे, ज्यांना “बूबोस” म्हणत. हे फोड कमर, बगल किंवा मानेत होते आणि त्याचा आकार सफरचंद किंवा अंड्याइतका मोठा असायचा. याशिवाय, ताप, कंपकंपी, मांसपेशीत वेदना, डोकेदुखी, उलट्या, आणि त्वचेवर काळे डाग अशी लक्षणे दिसायची. संसर्ग वाढल्यावर त्वचासड होऊन रुग्णाचा मृत्यू निश्चित असे.

महामारीचा प्रभाव

या महामारीने पाच वर्षांच्या आत, युरोपातील एक तृतीयांश लोकसंख्या नष्ट झाली. अशुद्ध स्वच्छता, घनदाट लोकसंख्या, आणि व्यापारी मार्गांमुळे रोग वेगाने पसरला. चीन, भारत, फारस, दमिश्क, काहिरा यांसारख्या देशांवर याचा गंभीर परिणाम झाला. युरोपमध्ये गाव आणि शहरे रिकामी झाली; शेती, व्यापार, आणि सामाजिक व्यवस्था कोलमडली.

मानवजातीसाठी धडा

ब्लॅक डेथने जगाला स्वच्छतेचे महत्त्व आणि महामारीचे संभाव्य परिणाम शिकवले. हा इतिहास मानवी आरोग्य आणि जगभरच्या आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा धडा ठरला. ब्लॅक डेथसारख्या महामारींनी दाखवले की मानवजातीला रोग आणि संसर्गाविरुद्ध कायम जागरूक राहावे लागते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कोण घेणार जस्टिन ट्रुडोंची जागा? कधी होणार निवडणुका?

Web Title: Worst pandemic in hisory of world devastates europe asia africa continents nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • China

संबंधित बातम्या

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला
1

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला
2

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने
3

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
4

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.