कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कोण घेणार जस्टिन ट्रुडोंची जागा? कधी होणार निवडणुका? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: सध्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय उलथापालथ सुरु आहे. राजकीय आणि आर्थिक आघाडीवर संघर्ष सुरु असलेल्या कॅनडाची नवीन सुरुवात कशी असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. जनता आणि त्यांच्या लिबरल पक्षातील नेत्यांच्या नाराजीनंतर ट्रुडो यांनी पद आणि पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष कॅनडाचा नवा पंतप्रधान कोण असे याकडे लागलेले आहे.
नवीन पंतप्रधान कधी निवडला जाईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया देशासारख्या देशांच्या तुलनेत कॅनडामध्ये पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया खूप वेगळी आहे. येथे पंतप्रधानाची निवड पक्षाच्या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येते. या प्रक्रियेसाठी काही महिने लागतात. त्यामुळे नवीन नेता निवडला जाईपर्यंत ट्रूडोच पंतप्रधानपद भूषवतील.
लिबरल पक्षाने या प्रक्रियेस सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. 2013 साली ट्रूडो यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा नेते निवडण्यासाठी 5 महिने लागले होते. तर 2006 साली हा कालावधी 8 महिने होता. त्यामुळे ट्रूडो यांची जागा घेणारा नेता निवडला जाईपर्यंत काही महिने लागण्याची शक्यता आहे.
नवीन नेत्याची निवड लवकर होईल का?
सध्या लिबरल पक्षासाठी अनेक मोठी आव्हाने आहेत. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या पराभवाती शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे पक्ष नवीन नेत्याची निवड शक्य तितक्या लवकर प्रयत्न करेल. मात्र, ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षाकडे लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व नाही. यविशेष अधिवेशन आयोजित यामुळे पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोण घेणार जस्टिन ट्रुडोंची जागा?
जस्टिन ट्रूडो यांच्या जागी कोण येणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. सध्याच्या परिस्थितीत, इनोव्हेशन मंत्री फ्रँकोइस फिलिप, ट्रान्सपोर्ट मंत्री अनीता आनंद, विदेश मंत्री मेलानी जॉली, तसेच माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलंड यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्ने यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून समोर आले आहे. मात्र, त्यांना या पदासाठी संसद सदस्य बनावे लागेल.
कॅनडामध्ये निवडणुका कधी होतील?
जर लिबरल पक्षाने बहुमत राखले, तर निवडणुका नियोजित वेळेनुसार ऑक्टोबर 2025 मध्ये होऊ शकतात. मात्र, ट्रूडो यांच्या अल्पमत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता असल्याने निवडणुका मे महिन्यातही होऊ शकतात. त्यामुळे कॅनडाच्या राजकीय परिस्थितीत आगामी काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत.