Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Update : येमेनची रणमैदानात उडी! अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला, 5 भारतीय जखमी; इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास

Middle East War : अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेला सुरुवात होणार होती, परंतु तेहरानने अटी स्वीकारण्यास नकार दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 28, 2026 | 12:54 PM
yemen enters war indians injured abu dhabi missile attack iran thailand oil deal 2026

yemen enters war indians injured abu dhabi missile attack iran thailand oil deal 2026

Follow Us
Follow Us:
  • येमेनची उडी अन् भारताला झळ
  • इराण-थायलंड गुप्त करार
  • हिजबुल्लाहचा मर्कवा रणगाड्यांवर हल्ला

Yemen enters US Iran Israel War 2026 : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला (US-Israel Iran War) आता २१ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. शांततेच्या सर्व वाटाघाटी फिस्कटल्या असून आता हे युद्ध अधिक हिंसक वळण घेत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत या युद्धापासून दूर असलेला येमेन आता थेट मैदानात उतरला असून त्यांनी इस्रायल आणि मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या युद्धाची झळ आता भारतीयांनाही बसू लागली असून अबु धाबीतील हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे.

अबु धाबीत क्षेपणास्त्र वर्षाव: ५ भारतीय जखमी

येमेनकडून अबु धाबीच्या दिशेने डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली खरी, पण या क्षेपणास्त्रांचे अवशेष शहरात पडल्याने मोठी दुर्घटना घडली. खलिफा इकॉनॉमिक झोनमध्ये या अवशेषांमुळे भीषण आग लागली. या घटनेत ५ भारतीय नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ही बातमी समोर येताच भारतात चिंतेचे वातावरण आहे. येमेनच्या या हल्ल्याने सिद्ध केले आहे की, आता हे युद्ध केवळ इराणपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण आखाती देश यात ओढले जात आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने

इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास: होर्मुझमध्ये नवा खेळ

एकिकडे युद्ध सुरू असताना इराणने एक मोठी मुत्सद्दी खेळी खेळली आहे. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी जाहीर केले की, इराणसोबत झालेल्या विशेष करारानुसार थाई तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाची मुभा मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच थायलंडच्या जहाजावर अज्ञात हल्ला झाला होता, ज्यामध्ये ३ कर्मचारी बेपत्ता झाले होते. आता इराणने थायलंडला दिलेली ही सवलत ट्रम्प प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे, कारण यामुळे अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांना खिंडार पडण्याची शक्यता आहे.

BREAKING: Yemeni Houthis have officially entered the war alongside Iran against the US and Israel. Bab al-Mandab Strait is at risk, like the Strait of Hormuz, which could bring catastrophic consequences for the global economy. pic.twitter.com/OF3Km46LHu — Current Report (@Currentreport1) March 28, 2026

credit – social media and Twitter

हिजबुल्लाहचे इस्रायली रणगाड्यांवर ‘ड्रोन’ हल्ले

लेबनॉनच्या सीमेवरही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. इस्रायलने लिटानी नदीपर्यंत ‘बफर झोन’ तयार करण्याची घोषणा केल्यानंतर हिजबुल्लाहने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिजबुल्लाहने दावा केला आहे की, त्यांनी इस्रायलचे दोन ‘मर्कवा’ रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत. रॉकेट, तोफगोळे आणि आत्मघाती ड्रोनच्या साहाय्याने हिजबुल्लाहने इस्रायली सैन्याला लिटानी नदी ओलांडण्यापासून रोखले आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी उत्तर इस्रायलच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले असले तरी, हिजबुल्लाहचा प्रतिकार इस्रायलसाठी डोकेदुखी ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War End: ‘सैन्य पाठवण्याची गरज भासणार नाही…’ 10 दिवसांचा डेडलाइन ड्रामा; रुबियोने सांगितला ट्रम्पचा खरा प्लॅन

 शांततेची आशा मावळली?

ट्रम्प प्रशासन आणि इराण यांच्यात पाकिस्तानमार्फत चर्चा सुरू होणार होती, पण इराणने अमेरिकेच्या कडक अटी फेटाळून लावल्या आहेत. येमेनची युद्धात एन्ट्री आणि भारतीयांना झालेली दुखापत यामुळे आता हे युद्ध जागतिक स्तरावर संताप निर्माण करत आहे. जर येमेन आणि हिजबुल्लाहने आपले हल्ले वाढवले, तर अमेरिका थेट जमिनीवर सैन्य उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अबु धाबीतील हल्ल्यात किती भारतीय जखमी झाले आहेत?

    Ans: येमेनने डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या ढिगाऱ्यामुळे अबु धाबीमध्ये ५ भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.

  • Que: इराण आणि थायलंडमध्ये कोणता करार झाला आहे?

    Ans: इराणने थायलंडच्या तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही अडथळ्याविना जाण्याची परवानगी दिली आहे.

  • Que: हिजबुल्लाहने इस्रायलच्या कोणत्या रणगाड्यांवर हल्ला केला?

    Ans: हिजबुल्लाहने इस्रायलचे शक्तिशाली 'मर्कवा' (Merkava) रणगाडे आणि लिटानी नदीच्या दिशेने सरकणाऱ्या सैनिकांना लक्ष्य केले आहे.

Web Title: Yemen enters war indians injured abu dhabi missile attack iran thailand oil deal 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • America
  • Israel
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO
1

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO

Iran War Strategy: ‘ट्रम्पचा कार्यकाळ संपेपर्यंत इराण युद्ध सुरूच ठेवणार’; IRGC अधिकाऱ्याचा अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा मोठा दावा
2

Iran War Strategy: ‘ट्रम्पचा कार्यकाळ संपेपर्यंत इराण युद्ध सुरूच ठेवणार’; IRGC अधिकाऱ्याचा अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा मोठा दावा

Strait Of Hormuz : 2029 पर्यंत बंद राहील होर्मुझ? ट्रम्प कसे अडकले मुज्तबाच्या पटावर; इराणच्या चक्रव्यूहाने अमेरिका हतबल
3

Strait Of Hormuz : 2029 पर्यंत बंद राहील होर्मुझ? ट्रम्प कसे अडकले मुज्तबाच्या पटावर; इराणच्या चक्रव्यूहाने अमेरिका हतबल

ISI Funding: अमेरिकेचा पाकिस्तानला दणका; लष्कर आणि ISI च्या अब्जावधींच्या ‘गुप्त’ खर्चाबद्दल दिले ‘असे’ स्पष्ट आदेश
4

ISI Funding: अमेरिकेचा पाकिस्तानला दणका; लष्कर आणि ISI च्या अब्जावधींच्या ‘गुप्त’ खर्चाबद्दल दिले ‘असे’ स्पष्ट आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.