Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात

Yeman Breaking : येमेनमधील संघर्षामुळे ३ लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले असून त्यात सुमारे १.६५ लाख मुलांचा समावेश आहे. हिंसाचारामुळे मुलांचे शिक्षण, सुरक्षा आणि आरोग्य धोक्यात आले असून युनिसेफने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 08, 2026 | 07:47 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • संघर्षामुळे हजारो कुटुंबाना घर सोडण्याची वेळ
  • मुलांच्या शिक्षणावर आणि सुरक्षेवर परिणाम
  • युनिसेफकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन
Yeman Breaking : इराण ,इस्रायल आणि अमेरिका युद्ध सुरु असतानाच सौदी आणि येमेनमधील हुथींनी पुन्हा संघर्ष करायला सुरवात केली . येमेनमध्ये सौदी समर्थक सरकार आणि सौदी अरेबिया एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हुथी असा संघर्ष आता टोकाला जाताना दिसत आहे . यांच्यामध्ये असलेली जनता भरडली जात असताना , या संघर्षाचा फटका सर्वाधिक लहान मुलांना बसत आहे .

सततचा हिंसाचार आणि देशातील अस्थिर वातावरण यामुळे येमेनमधील ३ लाखांहून जास्तच लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे . राहती घरे , जमेल तेवढं सामना घेऊन ही माणसे दारोदार भटकत आहेत . या सगळ्यांमध्ये सुमारे १ लाख ६५ हजार मुलांचा समावेश आहे .

संयुक्त राष्ट्रांच्या बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेने ( UNICEF ) या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे . विस्थापनामुळे मुलांची सुरक्षा आणि भविष्यातील संधी , चांगले आयुष्य हे पूर्णपणे धोक्यात आल्याचे या संस्थेने म्हंटले आहे.

संघर्षामुळे हजारो कुटुंबाना घर सोडण्याची वेळ

येमेनमधील सरकारी सैन्य आणि हुथी बंडखोर यांच्यातील संघर्षामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे . खासकरून पश्चिम येमेनमधील भागांमध्ये हिंसाचार वाढल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणांच्या शोधात स्थलांतर करावे लागत आहे . अनेक कुटुंबाना घरातील आवश्यक वस्तू घेण्याचीही संधी मिळत नसल्याने त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत विस्थापित व्हावे लागत आहे . तैझ परिसरात विस्थापित नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून निवारा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर झाला आहे .

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर

मुलांच्या शिक्षणावर आणि सुरक्षेवर परिणाम

या संघर्षात मुलांचे बालपण हिरावले जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे . विस्थापित झालेल्या मुलांना शाळा सोडावी लागत असून अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे . राहण्यासाठी सुरक्षित जागा , पुरेसे अन्न , स्वछ पाणी आणि आरोग्यसेवा मिळवणे ही कठीण झाले आहे . हिंसाचाराच्या वातावरणात मुलांचे शोषण , कुपोषण आणि इतर धोक्यांची शक्यता वाढत आहे . युनिसेफने मुलांच्या संरक्षणासाठी तातडीने मदत आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे .

US Midterms : भारतीय-अमेरिकन मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात का दिला कौल? मतदारांमधील संतापाची ‘ही’ मुख्य कारणे

युनिसेफकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन

युनिसेफचे प्रादेशिक प्रवक्ते सलीम ओवेस यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे . त्यांच्या माहितीनुसार ३ लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले असून त्यामध्ये सुमारे १ लाख ६५ हजार मुलांचा समावेश आहे .मुलांचे संरक्षण , शिक्षण आणि आरोग्य यांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली .

दरम्यान , संयुक्त राष्ट्रांच्या मदत यंत्रणा विस्थापित कुटुंबांपर्यंत पाणी , अन्न , आरोग्यसेवा आणि बालसंरक्षण सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत . मात्र वाढता संघर्ष आणि मदतीतील अडथळे यामुळे परस्थिती अजूनच बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .

Web Title: Yemen news 300000 displaced 165000 children unicef humanitarian crisis cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • unicef
  • yemen

संबंधित बातम्या

Agriculture career: शेती-शिवार आता बनले कॉर्पोरेट हब! १२ वी ॲग्रीकल्चरनंतर ‘या’ कोर्सेसना आहे मोठी मागणी; पाहा जॉब ऑप्शन्स
1

Agriculture career: शेती-शिवार आता बनले कॉर्पोरेट हब! १२ वी ॲग्रीकल्चरनंतर ‘या’ कोर्सेसना आहे मोठी मागणी; पाहा जॉब ऑप्शन्स

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर
2

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा
3

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा

Salman Khan Announces Rs 11 Movie Ticket: सलमान खानचा सिनेमा पाहण्याची सुवर्णसंधी! तिकीट फक्त ११ रुपये, पण आहे एक खास अट
4

Salman Khan Announces Rs 11 Movie Ticket: सलमान खानचा सिनेमा पाहण्याची सुवर्णसंधी! तिकीट फक्त ११ रुपये, पण आहे एक खास अट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.