Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Iran strikes : इराणच्या मदतीला Yemenची धाव! ‘जर इराणविरोधी युद्धात सामील झाला, तर अमेरिकन जहाजांवर हल्ले करू’

Houthis vow attack US ships : पश्चिम आशियात उडालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील हौथी बंडखोरांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. इराणच्या मदतीला येमेनने हाक दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 22, 2025 | 11:34 AM
Yemen's Houthis vow to attack American ships if US joins Israel's war against Iran

Yemen's Houthis vow to attack American ships if US joins Israel's war against Iran

Follow Us
Close
Follow Us:

Houthis vow attack US ships : पश्चिम आशियात उडालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील हौथी बंडखोरांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यांनी शनिवारी स्पष्ट केले की, जर अमेरिका इस्रायलसोबत इराणविरुद्धच्या युद्धात थेट सहभागी झाली, तर ते अमेरिकन जहाजांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू करतील. या घोषणेनंतर लाल समुद्र आणि पश्चिम आशियातील समुद्री वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

हौथींनी हे वक्तव्य अमेरिकेने इराणच्या फोर्डो अणुसंवर्धन केंद्रावर केलेल्या हल्ल्याच्या काही तास आधी केले. या हल्ल्याने वॉशिंग्टनचा या संघर्षातील थेट सहभाग दाखवला, आणि या घटनेनंतरच हौथींचा इशारा समोर आला. हौथींनी आपल्या निवेदनात म्हटले, “जर इस्रायली शत्रूसोबत इराणविरोधी आक्रमकतेत अमेरिकेचा सहभाग असेल, तर आमचे सशस्त्र दल लाल समुद्रात त्यांच्या जहाजांना आणि युद्धनौकांना लक्ष्य करतील.”

इराणच्या समर्थनार्थ हौथी पुन्हा सक्रिय?

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या दबावामुळे हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले थांबवले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या वेळी म्हटले होते की, हौथींनी “शरणागती पत्करली” आहे, आणि अमेरिका देखील त्यांच्यावरचे हल्ले थांबवेल. मात्र, आता हौथींनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, इराणवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. मध्यपूर्वेतील सूत्रांनी सांगितले की, हौथींसह इतर बंडखोर गट पुन्हा एकदा अमेरिकन लक्ष्यांवर हल्ले करण्याच्या तयारीत आहेत, तसेच इस्रायलवरही प्रचंड आक्रमणे करण्याचा विचार चालू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : अमेरिकेचीही युद्धात जोरदार एंट्री! ‘B-2 bombers’ आणि ‘Tomahawk missiles’नी इराणमध्ये केला कहरच

अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्सची भूमिका महत्त्वाची

हौथी हे इराणच्या नेतृत्वाखालील ‘अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’चा भाग आहेत. या नेटवर्कमध्ये हमास (पॅलेस्टीन), हिजबुल्ला (लेबनॉन), आणि इराकमधील इराण-समर्थित शिया गटांचा समावेश आहे. या गटांचा उद्देश इस्रायलच्या वर्चस्वाला विरोध करणे आणि पश्चिम आशियात इराणच्या प्रभावाचे संरक्षण करणे हा आहे.

2023 साली गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर या गटांनी इस्रायलवर सतत हल्ले सुरू केले होते. मात्र, इस्रायलच्या प्रबळ लष्करी प्रतिकारामुळे या गटांची ऑपरेशनल क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. हिजबुल्ला गट, जो पूर्वी इराणसाठी अग्रभागी होता, त्याचे अनेक नेते इस्रायली हल्ल्यांमध्ये ठार झाले असून त्यांचा शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे.

इराकी गटांचा इशारा

इराकमध्ये देखील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारच्या जवळच्या सूत्रांनी ‘द नॅशनल’ला सांगितले की, इराण-समर्थक इराकी दहशतवादी गटांनी अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला आहे. जर अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केला, तर त्यांना तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल. या इशाऱ्यामुळे अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांना संभाव्य आघाड्यांवर सज्ज राहावे लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Iran strikes : आता शांत बसणार नाही इराण; ‘यापूर्वी कधीही झाला नसेल असा हल्ला करू…’ खामेनींनी घेतली बदला घेण्याची शपथ

संघर्षाचा पुढील टप्पा अधिक धोकादायक?

इराणवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे हौथी बंडखोर, हिजबुल्ला, हमास आणि इतर गट पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, हौथींच्या धमक्यांनी मध्यपूर्वेत अस्थिरता वाढवण्याची चिन्हं आहेत. पश्चिम आशियातल्या बदलत्या लष्करी समीकरणांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणसोबतच येमेनमधील हौथी बंडखोरही आता प्रभावी खेळाडू म्हणून समोर येत आहेत, आणि त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – इराणविरुद्ध कोणत्याही हल्ल्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देणे.

Web Title: Yemens houthis vow to attack american ships if us joins israels war against iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
2

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
3

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
4

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.