Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

Zelenskyy Reaction Maduro : मादुरोच्या अटकेनंतर, झेलेन्स्की यांनी पुतिन यांना इशारा दिला की "पुढील पाऊल काय असेल हे अमेरिकेला माहिती आहे." मादुरो आता न्यू यॉर्कमध्ये 'या' खटल्यांना सामोरे जातील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 04, 2026 | 12:53 PM
Zelensky taunts Putin over Maduro's arrest saying America knows what the next step will be

Zelensky taunts Putin over Maduro's arrest saying America knows what the next step will be

Follow Us
Follow Us:
  • मादुरो यांच्या अटकेनंतर झेलेन्स्की यांनी पुतिन यांना टोमणा मारला की, “जर हुकूमशहा त्यांच्या बेडरूममधून खेचून न्यायालयात आणले जाऊ शकतात, तर अमेरिकेला आता पुढचे पाऊल काय असेल हे माहित आहे.“
  • अमेरिकेने ‘डेल्टा फोर्स’च्या मदतीने मादुरो आणि त्यांच्या पत्नीला कराकसमध्ये अटक करून न्यूयॉर्कला नेले आहे, जिथे त्यांच्यावर नार्को-दहशतवादाचा खटला चालेल.
  •  रशियाने या अटकेचा ‘सशस्त्र आक्रमकता’ म्हणून निषेध केला आहे, तर झेलेन्स्की यांनी या घटनेला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या इतर नेत्यांसाठी धोक्याची घंटा म्हटले आहे.

Zelenskyy reaction to Nicolas Maduro arrest 2026 : शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अमेरिकन विशेष सैन्याने ज्या धाडसाने अटक केली, त्याचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. या ऐतिहासिक घटनेवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. झेलेन्स्की यांनी अप्रत्यक्षपणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना लक्ष्य करत, हुकूमशहांचा अंत आता जवळ असल्याचे संकेत दिले आहेत.

“पुढचे पाऊल अमेरिकेला ठाऊक आहे” : झेलेन्स्की

युरोपीय सुरक्षा सल्लागारांच्या भेटीनंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना झेलेन्स्की म्हणाले, “जर हुकूमशहांना अशा प्रकारे हाताळणे शक्य असेल, तर वॉशिंग्टनला आता नक्कीच माहित आहे की पुढचे मोठे पाऊल कोणाविरुद्ध उचलायचे आहे.” झेलेन्स्की यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी, त्यांचा रोख रशिया आणि तिथल्या नेतृत्वाकडे असल्याचे स्पष्ट होते. या विधानामुळे पत्रकार परिषदेत हास्याची लाट उसळली, पण त्यामागील गंभीर राजकीय संदेशाने क्रेमलिनच्या गोटात मात्र अस्वस्थता निर्माण केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested : ‘कायर लोकांनो या…’ मादुरोचं चॅलेंज ट्रम्पने स्वीकारलं, सहपत्नीक घातल्या बेड्या; व्हेनेझुएलात आता अमेरिकन राजवट

कसा झाला मादुरो यांचा ‘पर्प वॉक’?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुष्टी केली आहे की, मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस (Cilia Flores) यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आले आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मादुरो हातकड्यांमध्ये आणि चप्पल घालून फेडरल एजंट्सच्या ताब्यात दिसत आहेत. त्यांच्यावर ‘नार्को-दहशतवाद’ आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. ट्रम्प यांनी या मोहिमेला ‘स्टनिंग आणि पॉवरफुल’ (Stunning and Powerful) असे संबोधले आहे.

Ukraine President Zelenskyy on Venezuela President Maduro: “What can I say here? If this can be done to dictators, like that, then the United States of America know what they should do next.” Zelenskyy suggests US should capture Putin. But US too has violated sovereignty. pic.twitter.com/VnbbMSYLoH — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 4, 2026

credit : social media and Twitter

रशियाचा तीव्र संताप आणि मादुरोची पाठराखण

रशियाने या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला ‘सशस्त्र आक्रमकता’ (Armed Aggression) म्हटले असून, मादुरो यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. “एका सार्वभौम देशाच्या निवडून आलेल्या नेत्याचे अशा प्रकारे अपहरण करणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचा अपमान आहे,” असे रशियाने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, मादुरो यांच्यावर २५ वर्षांपासून ड्रग्ज तस्करीचा आरोप होता आणि त्यांना आता अमेरिकन न्यायालयात उत्तर द्यावे लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप

पुतिन यांच्यासाठी धोक्याची घंटा?

तज्ज्ञांच्या मते, झेलेन्स्की यांचे विधान हे पुतिन यांच्यासाठी एक मानसिक युद्ध आहे. जर अमेरिका व्हेनेझुएलामध्ये घुसून तिथल्या प्रमुखाला अटक करू शकते, तर भविष्यात रशियाच्या नेतृत्वाबद्दलही अशाच हालचाली होऊ शकतात, अशी भीती आता रशियाच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. या अटकेने जगभरातील हुकूमशहा नेत्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की, अमेरिकन न्यायव्यवस्थेपासून कोणीही सुरक्षित नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: झेलेन्स्की यांनी मादुरोच्या अटकेवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: झेलेन्स्की म्हणाले की, जर हुकूमशहांना अशा प्रकारे अटक करणे शक्य असेल, तर अमेरिकेला आता पुढचे पाऊल (Next Step) कोणाविरुद्ध उचलायचे हे नीट ठाऊक आहे.

  • Que: निकोलस मादुरो यांना कुठे ठेवण्यात आले आहे?

    Ans: मादुरो आणि त्यांच्या पत्नीला सध्या न्यूयॉर्कमधील एका फेडरल डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे.

  • Que: रशियाने या घटनेवर काय म्हटले आहे?

    Ans: रशियाने याला 'सशस्त्र आक्रमकता' म्हटले असून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Zelensky taunts putin over maduros arrest saying america knows what the next step will be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Donald Trump
  • third world war
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky

संबंधित बातम्या

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
1

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
2

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
3

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार
4

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.