Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: बर्फात सापडले घातपाताचे धागेदोरे! पुतिन यांच्या हत्येच्या कट युक्रेनला पडणार महागात, पुराव्यांबाबत संभ्रम

Novgorod region : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या जवळपास चार वर्षांपासून सुरू आहे. रशियाने अलिकडेच युक्रेनवर पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 01, 2026 | 11:32 AM
russia ukraine war putin residence drone attack evidence video zelensky claims denied

russia ukraine war putin residence drone attack evidence video zelensky claims denied

Follow Us
Close
Follow Us:
  •  राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या गुप्त निवासस्थानावर झालेल्या ९१ ड्रोन हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज आणि ढिगारे रशियाने अधिकृतपणे जगासमोर सादर केले आहेत.
  •  मॉस्कोने या घटनेला पुतिन यांच्यावरील थेट ‘दहशतवादी हल्ला’ घोषित केले असून युक्रेनला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
  •  अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता चर्चेच्या प्रयत्नांना या नवीन वादामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Russia presents evidence of Putin residence attack : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia-Ukraine War) आता चार वर्षे पूर्ण होत आली आहेत, पण शांततेऐवजी युद्धाची ठिणगी अधिकच वेगाने पसरताना दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा खळबळजनक दावा रशियाने केला होता. सुरुवातीला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी हे आरोप फेटाळून लावत पुराव्यांची मागणी केली होती. मात्र, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने या हल्ल्याचे ठोस पुरावे जगासमोर सादर करून खळबळ उडवून दिली आहे.

बर्फाच्छादित जंगलात सापडले ड्रोनचे अवशेष

रशियन संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये रशियाच्या वायव्येकडील नोव्हगोरोड प्रदेशातील बर्फाच्छादित जंगलात एका पडलेल्या आणि खराब झालेल्या ड्रोनचे अवशेष दिसत आहेत. रशियाचा दावा आहे की, २८-२९ डिसेंबरच्या रात्री युक्रेनने पुतिन यांच्या अत्यंत सुरक्षित आणि गुप्त ‘वलदाई’ (Valdai) निवासस्थानाला लक्ष्य करण्यासाठी तब्बल ९१ ड्रोन पाठवले होते. रशियाच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केल्याने मोठा अनर्थ टळला, असे रशियाने म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियाच्या विजयानेच युद्ध संपेल…’ नवीन वर्षाच्या पहाटे Putin यांची डरकाळी; Ukraine युद्धाबाबत जगाला दिला ‘हा’ मोठा इशारा

मॉस्कोचा संताप: “हा पुतिन यांच्यावर थेट हल्ला!”

क्रेमलिनने या घटनेला केवळ लष्करी कारवाई न म्हणता, पुतिन यांच्यावरील ‘वैयक्तिक आणि दहशतवादी हल्ला’ घोषित केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनला निर्वाणीचा इशारा दिला आहे. लावरोव्ह म्हणाले की, “या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी युक्रेनमधील महत्त्वाची ठिकाणे आम्ही आधीच निवडली आहेत आणि लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल.” रशियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे युक्रेनमधील प्रमुख शहरांवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांचा पाऊस पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

🚨⚡️Zelensky, who publicly denies attacking Putin’s residence, either is unaware of the reality or is deliberately lying. The agency provided indisputable evidence of the Ukrainian Armed Forces’ attack: ▪️ Wreckage of downed drones, including those carrying warheads loaded with… pic.twitter.com/S1NDKNx0Kj — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) December 31, 2025

credit : social media and Twitter

झेलेन्स्कींचा इन्कार आणि ट्रम्प यांचा शांतता करार

दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे हे पुरावे खोटे असल्याचे म्हटले आहे. रशिया स्वतःच असे हल्ले घडवून आणत आहे किंवा खोट्या कथा रचत आहे, असा दावा कीव्हने केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा तणाव अशा वेळी वाढला आहे जेव्हा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन शांतता करार ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. युरोपीय देशांच्या मदतीने सुरू असलेल्या या शांतता प्रक्रियेत आता पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मुद्दा मोठा अडथळा ठरू शकतो.

🇷🇺🇺🇦 – RUSSIA | UKRAINE 🔴 The Russian Ministry of Defense has released a video it claims shows the debris of a Ukrainian drone intercepted while heading toward the residence of Vladimir Putin in Valdai. 🔎 However, nighttime conditions and weather limitations make it… pic.twitter.com/PIW2aicE11 — NEXUSx (@Nexus_osintx) December 31, 2025

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी

पुढची वाटचाल काय?

रशियाने सादर केलेले हे पुरावे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहेत. जर हे ड्रोन खरोखरच युक्रेनचे असल्याचे सिद्ध झाले, तर झेलेन्स्की यांची जागतिक स्तरावर अडचण होऊ शकते. तसेच, रशियाकडून होणारा संभाव्य पलटवार या युद्धाला एका अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथून परत येणे कठीण होईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जगाला शांततेऐवजी युद्धाच्या ज्वाला अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा कोणता पुरावा दिला आहे?

    Ans: रशियाने व्हिडिओ फुटेज आणि ड्रोनचे अवशेष जारी केले आहेत, जे नोव्हगोरोड प्रदेशातील बर्फाच्छादित जंगलात सापडले आहेत.

  • Que: हा हल्ला नक्की कधी आणि कुठे झाला होता?

    Ans: हा हल्ला २८-२९ डिसेंबर २०२५ च्या रात्री रशियाच्या वायव्येकडील नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या वलदाई निवासस्थानावर झाला होता.

  • Que: युक्रेनचे या प्रकरणावर काय म्हणणे आहे?

    Ans: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून रशिया खोटे पुरावे सादर करत असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Zelensky was proudly claiming that putins house was not attacked but now russia has presented evidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • International Political news
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky

संबंधित बातम्या

Iran-Israel War : रशियाला युद्धातून ‘असा’ही होतोय फायदा; युद्धातून अब्जावधीचा झाला नफा
1

Iran-Israel War : रशियाला युद्धातून ‘असा’ही होतोय फायदा; युद्धातून अब्जावधीचा झाला नफा

Myanmar Crisis : ‘मरण्यासाठी 1 लाख सैनिक तयार!’ म्यानमारच्या हुकूमशहाची क्रूर योजना; रशियाने पुरवला शस्त्रांचा डोंगर
2

Myanmar Crisis : ‘मरण्यासाठी 1 लाख सैनिक तयार!’ म्यानमारच्या हुकूमशहाची क्रूर योजना; रशियाने पुरवला शस्त्रांचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.