2026 Predictions: व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी २०२६ ठरणार 'गोल्डन इयर'! भारत-अमेरिका संबंधांत मोठे फेरबदल; पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Vladimir Putin 2026 predictions astrology : २०२५ हे वर्ष आता निरोप घेत असून संपूर्ण जगाचे लक्ष २०२६ कडे लागले आहे. हे नवीन वर्ष केवळ सामान्य लोकांसाठीच नाही, तर जगातील शक्तिशाली नेत्यांसाठीही मोठे बदल घेऊन येणार आहे. नामवंत ज्योतिषांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि भारत-अमेरिका संबंधांबाबत (India-US relations) काही खळबळजनक दावे केले आहेत. ग्रहांच्या बदलत्या हालचालींनुसार २०२६ मध्ये जागतिक राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ज्योतिषांच्या भाकितानुसार, २०२६ हे वर्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. पुतिन यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते की, मे २०२६ नंतर ते एक नवीन आणि प्रबळ जागतिक भागीदारी (Global Partnership) तयार करतील. रशिया केवळ लष्करीच नाही तर मुत्सद्देगिरीच्या जोरावर जगावर आपली पकड मजबूत करेल. विशेष म्हणजे, रशिया आणि अमेरिकेतील तणाव कमी होऊन त्यांच्यातही सहकार्याची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पुतिन यांची ताकद आणखी वाढेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
भारतासाठी रशिया हा नेहमीच एक विश्वासू मित्र राहिला आहे आणि २०२६ मध्ये हे नाते अधिक घट्ट होईल. ज्योतिषीय अंदाजानुसार, पुतिन भारताला आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठा करतील. जागतिक स्तरावर भारताला जेव्हा जेव्हा मदतीची गरज लागेल, तेव्हा रशिया खंबीरपणे भारताच्या पाठीशी उभा राहील. पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया भारतासाठी एक ‘कवच’ म्हणून काम करेल, असे या भविष्यवाणीत म्हटले आहे.
Putin’s India Visit Is About To Trigger a Western Meltdown… ⚠️ > Putin is arriving in India on Dec 4–5.
> Western nations have arrest warrants ready for him.
> Yet India invites him for a full bilateral visit… the only country he’s chosen in 2025.
> US/EU expected a… pic.twitter.com/Vty1ZBd3LP — The Tathya (@_TheTathya) December 1, 2025
credit : social media and Twitter
२०२६ मध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंधांबाबत एक रंजक भाकीत करण्यात आले आहे. अमेरिकेचे धोरण भारतासाठी काहीसे कडक असेल आणि ते भारतावर ‘व्यापार युद्ध’ (Trade War) लादण्याचा प्रयत्न करतील. मात्र, ज्योतिषांच्या मते, हे व्यापार युद्ध भारतासाठी तोट्याचे नसून एक मोठी संधी ठरेल. अमेरिकेला अखेर नमते घ्यावे लागेल आणि ते भारतासोबत नवीन व्यापार करारांवर स्वाक्षरी करतील. यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण आणि आर्थिक ताकद जगात वाखाणली जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी
२०२६ मध्ये होणारे ग्रहांचे संक्रमण भारताला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. अमेरिका असो वा रशिया, कोणालाही भारताकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. “एकटा भारत सर्वांसाठी भारी पडेल” अशी स्थिती निर्माण होईल. परराष्ट्र धोरणात भारताचा दबदबा वाढेल आणि भारत एक जागतिक लवाद म्हणून उदयास येईल. एकूणच, २०२६ हे वर्ष भारताच्या प्रगतीचे आणि पुतिन यांच्या पुनरागमनाचे वर्ष ठरेल
Ans: ज्योतिषांनुसार, २०२६ मध्ये पुतिन यांचे ग्रहमान अत्यंत प्रबळ असून ते रशियाला पुन्हा एकदा जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करतील.
Ans: अमेरिका भारतावर काही व्यापारी निर्बंध लादू शकते, पण ते भारतासाठी नवीन संधी आणि व्यापार करारांचे मार्ग उघडणारे ठरतील.
Ans: हो, २०२६ मध्ये रशिया भारताला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा करेल आणि भारताच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावेल.






