राजस्थानमधून मोठी बातमी समोर येत आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी मोठा अपघात झाला. भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान तेजस कोसळल्याची (Tejas fighter jet crashes)माहिती समोर येत आहे. युद्धाभ्यास सुरु असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने विमान कोसळण्यापुर्वी वैमानिक बचावण्यात यशस्वी झाले. मात्र, पॅराशूट वेळेवर न उघडल्याने तो जखमी झाला आहे.
[read_also content=”मुंबईतील उच्चभ्र परिसरात वृद्ध महिलेची हत्या, फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ https://www.navarashtra.com/crime/63-year-old-killed-in-mumbai-nepean-sea-road-area-nrps-514864.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारतीय वायुसेनेचं तेजस विमान आज जैसलमेरमध्ये ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान क्रॅश झालं. या अपघातातुन वैमानिक बचावला आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे.
जैसलमेर शहराच्या मध्यभागी जवाहर कॉलनीजवळ लोकवस्तीत हे विमान आगीच्या गोळ्यासारखे पडलं. विमान दुर्घटनाग्रस्त झालं तेव्हा खाली कोसळता प्लेनने एका हॉस्टेललाही धडक दिली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विमान पडल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. विमान पडताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दूरवर धुराचे लोट दिसत होते.
हा अपघात अशा वेळी घडला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ‘भारत शक्ती’ सराव पाहण्यासाठी राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजवर पोहोचले होते. या सराव दरम्यान, तिन्ही सैन्याच्या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांचे सामर्थ्य दाखवण्यात आले.






