फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कार असो, बाईक असो की स्कूटर. इथे प्रत्येक वाहनाला दमदार मागणी मिळताना दिसत आहे. त्यातही जेव्हापासून इलेक्ट्रिक वाहने भारतात लाँच होऊ लागले आहेत. तेव्हापासून तर वाहनांची अजूनच विक्री वाढली आहे. हीच मागणी, इतर देशातील ऑटो कंपन्यांना सुद्धा भारतात आपली वाहनं लाँच करण्यास प्रोत्साहित करत असते.
15 जुलै 2025 हा दिवस दोन विदेशी कार उत्पादक कंपन्यांसाठी खूप खास ठरणार आहे. या दिवशी कोणते दोन उत्पादक देशात अधिकृतपणे आपला प्रवास सुरू करतील, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
या आठवड्यात लाँच होणार सर्वात स्वस्त Electric MPV? जाणून घ्या फीचर्स आणि अपेक्षित किंमत
15 जुलै 2025 हा दिवस अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक Tesla साठी खूप स्पेशल असणार आहे. या दिवशी, भारतीय मार्केटमध्ये टेस्ला अधिकृतपणे त्यांची कार लाँच करणार आहे असे बोलले जात आहे . अशी अपेक्षा आहे की टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी देखील या प्रसंगी मुंबईतील टेस्ला शोरूममध्ये दिसू शकतात.
कंपनीने अद्याप याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु टेस्ला भारतात Model Y सह आपला प्रवास सुरू करू शकते अशी अपेक्षा आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 526 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते.
15 जुलै 2025 हा दिवस व्हिएतनामच्या आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी विनफास्टसाठी देखील खूप खास असणार आहे. या दिवशी कंपनी त्यांच्या दोन इलेक्ट्रिक कारची अधिकृतपणे बुकिंग सुरू करेल.
काय होतास तू, काय झालास तू ! Vida VX2 चा दावा केलेला रेंज 94 KM, मात्र प्रत्यक्षात दिसलं भलतंच
Vinfast VF6 आणि VF7 चे बुकिंग येत्या 15 जुलै 2025 पासून सुरू होईल. कंपनी भारतात 32 डीलरशिपसह या कार ऑफर करण्याची तयारी करत आहे. देशातील 27 शहरांमध्ये या कार ऑफर केल्या जातील. यामध्ये दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता, कोचीन, भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, चंदीगड, लखनऊ, कोइम्बतूर, सुरत, कालिकत, विशाखापट्टणम, विजयवाडा, शिमला, आग्रा, झाशी, ग्वाल्हेर, वापी, बडोदा आणि गोवा यासारख्या शहरांचा समावेश असेल.