फोटो सौजन्य: @_AutoIndian_ (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच वाढत्या मागणीकडे लक्ष देत अनेक कार उत्पदक कंपन्या मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करीत आहे, ज्यांना ग्राहक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत. आता लवकरच किया मोटर्स सुद्धा भारतीय बाजारात दमदार इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे.
भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये दमदार वाहनं ऑफर करणारी दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किआ या आठवड्यात नवीन वाहन म्हणून Kia Carens Clavis EV लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून या कारमध्ये कोणती फीचर्स दिले जाऊ शकतात? ही कार किती रेंज देऊ शकते? ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एमपीव्ही असू शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
काय होतास तू, काय झालास तू ! Vida VX2 चा दावा केलेला रेंज 94 KM, मात्र प्रत्यक्षात दिसलं भलतंच
भारतीय ऑटो बाजारात किया मोटर्स एक नवीन इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहे. उत्पादक कंपनी Electric MPV म्हणून Kia Carens Clavis EV लाँच करणार आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्स दिले जातील. माहितीनुसार, त्यात सध्या ICE व्हर्जनमध्ये देण्यात येणारी सर्व फीचर्स देण्यात येतील. यात LED लाईट्स, LED DRL, पॅनोरॅमिक सनरूफ, एअर प्युरिफायर, अँबियंट लाईट्स, चारही व्हील्समध्ये डिस्क ब्रेक, ABS, EBD, 6 एअरबॅग्ज, हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड अँकरेज अशी अनेक फीचर्स असतील.
नवीन इलेक्ट्रिक MPV लाँच होण्यापूर्वी Kia ने अलीकडेच सोशल मीडियावर याचा पहिला टीझर रिलीज केला होता. त्यानुसार या MPV ला एका चार्जमध्ये 490 किमीची रेंज मिळेल असा अंदाज आहे. या रेंजसह, त्यात 51 kWh क्षमतेचा बॅटरी ऑप्शन देखील दिला जाऊ शकतो. याशिवाय, त्यात आणखी एक बॅटरी पर्याय देखील उपलब्ध असू शकतो.
Toyota Glanza आता झाली अधिकच सुरक्षित ! सगळ्या व्हेरिएंटमध्ये मिळाला ‘हा’ सेफ्टी फिचर
कंपनी ही कार 15 जुलै 2025 रोजी लाँच करेल, अशी माहिती आहे. त्याची नेमकी किंमत लाँचच्या वेळीच कळेल. परंतु त्याची एक्स-शोरूम किंमत १५ ते २० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
किआ ही Carens Clavis EV इलेक्ट्रिक बजेट एमपीव्ही म्हणून सादर करणार आहे. या कारला बाजारात असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक एमपीव्हीकडून थेट स्पर्धा होणार नाही. परंतु किमतीच्या बाबतीत, Hyundai Creta Electric, MG Windsor EV, आणि लवकरच लाँच होणारी Maruti Suzuki E Vitara सारख्या एसयूव्हींकडून स्पर्धा होईल.