फोटो सौैजन्य: Social Media
भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्यात Honda चा देखील समावेश आहे. होंडाने देशात अनेक बेस्ट कार आणि बाईक ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या बाईक तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. होंडा आपल्या बजेट फ्रेंडली बाईकसाठी जरी ओळखल्या जात असल्या तरी कंपनीच्या स्पोर्ट बाईकला सुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच कंपनी नवीन रूपात आपली स्पोर्ट बाईक लाँच केली आहे.
2025 होंडा CBR150R नवीन रंगात लाँच करण्यात आली आहे. तसेच या बाईकला पूर्वीपेक्षा चांगले डिझाइन देण्यात आले आहे. नवीन रंग म्हणून Honda Tricolor आणि Silver चा समावेश करण्यात आला आहे. बाईकमधील या नवीन अपडेट्ससोबतच, त्याच्या किमतीतही थोडी वाढ झाली आहे, जी सुमारे 2000 रुपये आहे. 2025 च्या होंडा CBR150R मध्ये कोणत्या नवीन गोष्टी मिळाल्या आहेत,त्याबद्दल जाणून घेऊया.
2025 मधील होंडा CBR150R दोन नवीन रंग ऑप्शन्ससह सादर करण्यात आली आहे. यातही सर्वात आकर्षक कलर होंडा ट्रायकलर आहे. यामध्येही लाल रंगाला महत्त्व देण्यात आले आहे. बाईकच्या साईड फेअरिंग आणि इंधन टाकीवर पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्टिंग शेड्स देखील आहेत. USD फोर्क्सचा लूक वाढवण्यासाठी त्याला सोनेरी रंग देण्यात आला आहे.
या बाईकला दुसरा रंग Silver आहे, जे होंडा ट्रायकलरपेक्षा साधा आहे. यामध्ये फ्रंट फॅसिया, साईड फेअरिंग, फ्युएल टँक आणि सीट सेक्शनवर चमकदार पिवळ्या रंगाचे एक्सेंट्स दिले गेले आहेत.
या बाईकचे डिझाइन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे, परंतु याच्या रंगात काही बदल करण्यात आले आहेत. या बाईकचे डिझाइन CBR1000RR-R, CBR650R आणि CBR250RR वरून प्रेरित आहे. यात फ्रंट फॅसिया, ड्युअल एलईडी हेडलाइट्स आणि शार्प डीआरएल, फ्रंट काऊल-माउंटेड स्टायलिश रियर-व्ह्यू मिरर, स्कल्प्टेड फ्युएल टँक, कॉम्पॅक्ट विंडस्क्रीन, स्पोर्टी फेअरिंग आणि स्प्लिट सीट्स व अपस्वेप्ट एक्झॉस्ट सिस्टम आहे.
या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत, ज्यात इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS), MyMAP प्रोग्राम अंतर्गत याला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे, फुल डिजिटल कलर इन्स्ट्रुमेंट पॅनेल. त्याच्या इन्स्ट्रुमेंट पॅनलमध्ये अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे.
या बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात जुने 149.2 सीसी, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड, DOHC इंजिन वापरले आहे, जे 16.09 एचपी पॉवर आणि 13.7 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स असिस्ट व स्लिपर क्लचशी जोडलेले आहे. त्यात दिलेल्या लिक्विड कूलिंग सिस्टममुळे, या बाईकचे इंजिन जास्त गरम होत नाही.