Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2025 Yezdi Adventure भारतात लवकरच होणार लाँच, नव्या फीचर्ससह मिळणार नवीन डिझाइन

भारतात अ‍ॅडव्हेंचर बाईक्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच आता Classic Legends कंपनी लवकरच भारतात आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक लाँच करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 13, 2025 | 09:16 PM
फोटो सौजन्य: www.yezdi.com

फोटो सौजन्य: www.yezdi.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतात आता मोठ्या प्रमाणात बाईक्सची विक्री केली जाते. यात विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. सध्या अ‍ॅडव्हेंचर बाईकची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट अ‍ॅडव्हेंचर बाईक ऑफर करत असतात. Classic Legends ही त्यातीलच एक कंपनी.

क्लासिक लेजेंड्स लवकरच भारतीय बाजारात 2025 Yezdi Adventure लाँच करणार आहे. ही बाईक आधी 15 मे 2025 रोजी लाँच होणार होती, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे कंपनीने त्याची लाँच डेट पुढे ढकलली आहे. त्याची नवीन लाँच डेट अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु, ती जूनमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. 2025 च्या क्लासिक लेजेंड्स Yezdi Adventure मध्ये कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

2025 Yamaha Tracer 7 सिरीज लाँच, डिझाइन आणि फीचर्समध्ये झाले मोठे बदल

कसे असेल नवीन डिझाइन?

2025 च्या Yezdi Adventure मध्ये डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात. नवीन हेडलाइट, टेललाइट आणि सीटमध्येही बरेच बदल दिसून येतात. इतकेच नाही तर नवीन Yezdi Adventure ला नवीन कलरस्कीम देखील दिली जाऊ शकते, ज्यामध्ये नवीन ग्राफिक्स देखील असण्याची अपेक्षा आहे.

फीचर्स

2025 च्या येझदी अ‍ॅडव्हेंचरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि यूएसबी टाइप-सी चार्ज पोर्टसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी फीचर्स पूर्वीप्रमाणेच कायम राहण्याची शक्यता आहे. यात तीन ABS मोड्स देखील आहेत – रोड, रेन आणि ऑफ-रोड. नवीन अ‍ॅडव्हेंचरमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतील, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला होईल.

इंजिन

2025 Yezdi Adventure मध्ये त्याच 334 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनचा वापर केला जाऊ शकतो, जो 29.6 पीएस पॉवर आणि 29.8 एनएम टॉर्क जनरेट करेल. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. याचे इंजिन लेटेस्ट OBD-2B उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी अपडेट केले जाऊ शकते. त्याच्या इंजिन ट्यूनमध्ये थोडे बदल करून त्यात सुधारणा अपेक्षित आहे.

परफेक्ट Electric Cars च्या शोधात आहात? ‘या’ ऑप्शनचा नक्की विचार करा, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

किंमत

नुकत्याच लाँच झालेल्या Yezdi Adventure ची एक्स-शोरूम किंमत 2,09,900 ते 2,19,900 रुपयांदरम्यान आहे. नवीन अपडेट मिळाल्यानंतर, त्याच्या किमतीत थोडी वाढ होऊ शकते. भारतीय मार्केटमध्ये, ही बाईक XPulse 210, KTM 250 Adventure, Suzuki V-Strom SX 250 आणि आगामी TVS Apache RTX 300 सारख्या इतर अ‍ॅडव्हेंचर बाईक्सशी स्पर्धा करते.

Web Title: 2025 yezdi adventure bike will soon launch in indian market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान
1

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही
2

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
3

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार
4

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.