फोटो सौजन्य; @YMUKofficial (X.com)
भारतासह जागतिक मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली बाईकसोबतच स्पोर्ट बाईक्सना देखील मोठी मागणी मिळते. भारतात स्पोर्ट्स बाईक्स ऑफर करणाऱ्या अनेक उत्तम कंपन्या आहेत. यामाहा ही त्यातीलच एक आघाडीची कंपनी आहे. नुकतेच कंपनीने युरोपमध्ये नवीन बाईक लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
2025 मध्ये यामाहाने आपली एक बाईक अपडेट केली आहे. या अपडेटमध्ये अनेक बाईक्सचा समावेश आहे. आता कंपनीने Yamaha Tracer 7 सिरीज अपडेट केली आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, तसेच त्यात अनेक फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.
परफेक्ट Electric Cars च्या शोधात आहात? ‘या’ ऑप्शनचा नक्की विचार करा, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
यामाहाने युरोपमध्ये 2025 Tracer 7 आणि Tracer 7 GT लाँच केले आहेत. यामाहाच्या या दोन्ही बाईकमध्ये काय नवीन गोष्टी देण्यात आले आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Yamaha ने 2025 Tracer 7 आणि Tracer 7 GT युरोपमध्ये 8,804 पौंड आणि 10,104 (अंदाजे 9.86 लाख रुपये आणि 11.32 लाख रुपये) लाँच केले आहेत. दोघेही समान CP2 समांतर-ट्विन इंजिन वापरतात. दोन्ही बाईक्समधील फरक एवढाच आहे की ट्रेसर 7 जीटीमध्ये साइड पॅनियर्स आणि सेंटर स्टँड स्टॅंडर्ड म्हणून बसवलेले आहेत.
जेव्हा तुम्ही 2025 Yamaha Tracer 7 ला दुरून पाहिले तर ती मागील व्हर्जनसारखेच दिसते, परंतु जेव्हा तुम्ही ही बाईक जवळून पाहता तेव्हा त्यात थोडासा बदल दिसून येतील. या बाईकमध्ये अधिक आकर्षक एलईडी डीआरएलएस, कॉम्पॅक्ट एलईडी हेडलाइट आणि पुन्हा डिझाइन केलेले बॉडी पॅनेल आहेत. यात नवीन फ्रंट फेंडर आणि नवीन विंडस्क्रीन देखील आहे. बाईकमध्ये काही अर्गोनॉमिक अपडेट्स देखील आहेत, ज्यात उंचावलेले हँडलबार, सीटमध्ये अधिक पॅडिंग समाविष्ट आहे. यात स्प्लिट-सीट सेटअप आहे. या बाईकची फ्युएल फ्युएल टॅंक 1 लिटरने वाढवण्यात आली आहे.
2025 यामाहा ट्रेसर 7 मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. आता त्यात अपडेटेड TFT डिस्प्ले आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. आधीच अस्तित्वात असलेल्या ड्युअल-चॅनेल ABS व्यतिरिक्त चार राइड मोड्स, दोन लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, तीन पॉवर मोड्स आणि क्रूझ कंट्रोल देखील आहेत.
2025 यामाहा ट्रेसर 7 चे अंडरपिनिंग्स देखील अपडेट करण्यात आले आहेत. पूर्वीप्रमाणेच, ही बाईक 689cc पॅरलल-ट्विन CP2 इंजिनने सुसज्ज आहे, जे 73ps पॉवर आणि 68nm टॉर्क जनरेट करते. मोनोशॉकला स्विंगआर्मशी एक नवीन लिंकेज मिळते आणि त्यात रिमोट प्रीलोड अॅडजस्टमेंट मिळते.