फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळेच आता मार्केटमध्ये सर्वच ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. पण अनेकदा इलेक्ट्रिक कार्सच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे कित्येक जण शेवटी EV खरेदी करण्याचा विचार सोडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर बाजारात काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण या बजेटमध्ये तीन सर्वोत्तम इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत.
एमजी कॉमेट ईव्ही ही भारतातील सर्वात परवडणारी आणि शहरी वापरासाठी सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 7 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही कार सुमारे 230 किमीची प्रॅक्टिकल रेंज देते आणि त्यात कॉम्पॅक्ट आणि फ्यूचरिस्टिक डिझाइन आहे. एमजी कॉमेट ईव्हीमध्ये उत्तम केबिन टेक्नॉलॉजी तसेच बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे ती आणखी बजेट फ्रेंडली कार बनते.
MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
टाटा टियागो ईव्ही ही भारतातील दुसरी सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार ARAI-प्रमाणित 315 किमीची रेंज देते. या कारमध्ये डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा देखील आहे. टाटा टियागो ईव्ही ही अशा ग्राहकांसाठी एक आदर्श पर्याय आहे, ज्यांना चांगले मायलेज, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि परवडणाऱ्या किमतीत विश्वासार्ह ब्रँड हवा आहे. ही कार केवळ शहरी भागासाठीच नाही तर उपनगरीय भागांसाठीही परिपूर्ण आहे.
Royal Enfield ला विसरा ! TVS करणार ‘ही’ खास बाईक लाँच, किलर लूकची सगळीकडेच होतेय चर्चा
टाटा पंच ईव्ही ही एसयूव्हीसारखी स्टाईल असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार दोन बॅटरी पर्यायांसह येते – 25 kWh आणि 35 kWh, जे 265 किमी आणि 365 किमीची रेंज देतात. टाटा पंच ईव्हीमध्ये एसयूव्हीसारखा मजबूत लूक, इलेक्ट्रिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलजी यासारखे प्रीमियम फीचर्स आहेत. ही कार अलिकडेच देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्हींपैकी एक बनली आहे.