
फोटो सौजन्य: iStock
गेल्या काही वर्षांत देशात ‘आपल्या कुटुंबासाठी स्वत:ची कार’ हे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नव्या कारसोबतच जुनी कार घेण्याची क्रेझही वाढली आहे. एकूण विकल्या जाणाऱ्या सेकंड हॅण्ड कारपैकी निम्म्याहून अधिक गाड्या या एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत. मागील चार वर्षांत एसयूव्हीचा मार्केट शेअर २३% वरून ५०% पेक्षा जास्त झाला आहे.
एक गडबड आणि Toyota च्या ‘या’ कारचे हजारो युनिट्स बोलावले परत, नेमकं झालं काय?
दर वाढले असले तरी ग्राहक सुरक्षित, उच्च दर्जाची, कमी वर्षांची आणि सर्व्हिस हिस्ट्री स्पष्ट असलेली कार घेण्याला प्राधान्य देत आहेत. सरासरी सेकंड हॅण्ड कारच्या किमतींमध्ये ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
नॉन-मेट्रो प्रदेशांतील ६८% ग्राहकांना सेकंड हॅण्ड कार अधिक पसंत
४२% ग्राहक पुन्हा त्याच ब्रँडची कार खरेदी करण्यास उत्सुक
एकूण विक्रीत ३०% हिस्सा — ४ ते ७ वर्षे जुन्या कारचा
जुनी वाहने इंजिन पॉवरच्या बाबतीत मजबूत
अगदी घाणेरड्यातील घाणेरडा हेल्मेट सुद्धा दिसेल एकदम चकाचक, ‘या’ आहेत सोप्या Helmet Cleaning Tips
जुन्या गाड्यांची इंजिन क्षमता अधिक असल्यामुळे त्यांची मागणी वाढली. नव्या कारमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमांमुळे इंजिन क्षमता कमी होत असली, तरी जुनी वाहने पॉवरफुल इंजिनसह उपलब्ध असतात. तसेच त्यांची किंमत नव्या कारपेक्षा कमी असल्याने ग्राहकांचा कल जुन्या गाड्यांकडे वाढतो, असे वाहतूक तज्ञ विवेक पै यांनी सांगितले.
ग्राहक फक्त परवडणारा पर्याय म्हणून नव्हे तर स्टायलिश, फीचर-लोडेड कार मिळण्यासाठी सेकंड हॅण्ड कार निवडत आहेत. गुणवत्तापूर्ण वाहनांच्या मागणीमुळेच किमतीत वाढ होत आहे.
Ans: सेकंड हॅण्ड कारच्या किंमती नव्या कारपेक्षा कमी असतात, इंजिन पॉवर जास्त असते, आणि सहज कर्ज व ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे खरेदी सोपी होते. तसेच नॉन-मेट्रो शहरांमधून मोठी मागणी असल्याने सेकंड हॅण्ड कार बाजार वेगाने वाढत आहे.
Ans: सर्व्हिस हिस्ट्री, ओडोमीटर रीडिंग, कारचे वय, इंजिनची स्थिती, अपघात इतिहास, टायर-कंडीशन आणि RTO कागदपत्रे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्वासार्ह प्लॅटफॉर्म किंवा प्रमाणित डीलरकडूनच कार खरेदी करावी.
Ans: महिंद्रा फर्स्ट चॉइस आणि व्होक्सवॅगन अहवालानुसार, 2030 पर्यंत भारतातील सेकंड हॅण्ड कार बाजार 95 लाख युनिट्सच्या विक्रीपर्यंत पोहोचेल, जे सध्या विकल्या जाणाऱ्या 59 लाख कारपेक्षा मोठी वाढ आहे.