फोटो सौजन्य: Gemini
Toyota Urban Cruiser Hyryder ही कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून ऑफर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीमध्ये खराबी आढळल्यानंतर याचे हजारो युनिट्स रिकॉल करण्यात आल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अगदी घाणेरड्यातील घाणेरडा हेल्मेट सुद्धा दिसेल एकदम चकाचक, ‘या’ आहेत सोप्या Helmet Cleaning Tips
अहवालांनुसार, ज्या युनिट्ससाठी रिकॉल जारी करण्यात आले आहे त्यांच्यामध्ये फ्युएल लेव्हल इंडिकेटरमध्ये खराबी आढळली आहे. हा रिकॉल फक्त एसयूव्हीच्या पेट्रोल युनिट्ससाठी जारी करण्यात आला आहे कारण त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ॲनालॉग फ्युएल गेज आहे. कधीकधी, हे गेज फ्युएल लेव्हल अचूकपणे प्रदर्शित करण्यात समस्या दर्शवू शकते, परिणामी टाकी संपली असतानाही कमी इंधन चेतावणी लाइट सक्रिय होत नाही. यामुळे ड्रायव्हर्सना कळणारच नाही की त्यांच्या कारमधील पेट्रोल संपत आहे. यामुळे इंजिन बंद होण्याचा धोका देखील वाढू धाकतो.
कंपनीने 10000 हून अधिक युनिट्ससाठी रिकॉल जारी केले आहे. हे युनिट्स डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान तयार करण्यात आले होते.
‘या’ Electric Cars चा दराराच वेगळा! फक्त 4 तासात चार्ज होऊन सटासट स्पीड पकडतात
टोयोटा कंपनीकडून या कारच्या युनिट्सचे मालक असलेल्या सर्व ग्राहकांना ई-मेल, फोन कॉल आणि मेसेजद्वारे रीकॉलची माहिती दिली जात आहे. त्यानंतर ग्राहकांनी आपल्या जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन नेणे आवश्यक आहे. तिथे प्रभावित युनिट्सची तपासणी केली जाईल आणि ज्या युनिट्समध्ये खराबी आढळतील त्यांची दुरुस्ती कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता करण्यात येईल.
Ans: या एसयूव्हीच्या पेट्रोल मॉडेल्समध्ये फ्युएल लेव्हल इंडिकेटरमध्ये बिघाड आढळला आहे. हा ॲनालॉग फ्युएल गेज कधीकधी इंधन पातळी अचूक दाखवत नाही.
Ans: कंपनीने १०,००० पेक्षा जास्त Urban Cruiser Hyryder युनिट्ससाठी रीकॉल जाहीर केला आहे. ही युनिट्स डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान तयार करण्यात आली होती.
Ans: टोयोटा कंपनी ग्राहकांना ई-मेल, फोन कॉल आणि मेसेजद्वारे रीकॉलची माहिती देत आहे. माहिती मिळाल्यानंतर ग्राहकांनी जवळच्या टोयोटा सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी नेणे आवश्यक आहे.






