फोटो सौजन्य: iStock
आपल्या प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. कुणाला चित्रपट पाहण्याचा, कुणाला पुस्तक वाचण्याचा, तर कुणाला भटकंतीचा. काही वेळा हे छंद इतके आगळे-वेगळे असतात की ऐकणाऱ्यांच्या भुवया उंचावतात. काही लोकं तर आपला छंद जोपासण्यासाठी लाखो-कोटी रुपये खर्च करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक अजब घटना हिमाचल प्रदेशात समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या वेगळ्या छंदासाठी प्रचंड खर्च केला आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. चला, तर मग या अनोख्या घटनेबद्दल अधिक जाणून घेऊया.
हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीने त्याच्या 1 लाख रुपयांच्या स्कूटरसाठी तब्बल 14 लाख रुपये खर्च केले आहे. प्रत्यक्षात, त्याने हे पैसे स्कूटरच्या व्हीआयपी नंबरसाठी खर्च केले आहे.
स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणेला Mercedes च्या ‘या’ कारने घातली भुरळ, किंमत 3 कोटींपेक्षा जास्त
अलीकडेच हिमाचलमधील हमीरपूर येथील रहिवासी संजीव कुमार यांनी एक नवीन स्कूटर खरेदी केली, ज्यासाठी त्यांना व्हीआयपी नंबर हवा होता. त्यानंतर, त्यांनी हिमाचल प्रदेश वाहतूक विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाइन लिलावात 14 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. अखेर संजीव कुमार यांनी HP21C-0001 हा क्रमांक त्यांच्या नावावर केला.
या लिलावात दोन जणांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये दुसरी व्यक्ती सोलन येथील रहिवासी होती. दुसऱ्या व्यक्तीने 13 लाख 50 हजार रुपयांची बोली लावली, त्यानंतर संजीव कुमार यांनी 14 लाख रुपयांची बोली लावली आणि ही नंबर प्लेट त्यांच्या नावावर केली. या मोठ्या रक्कमेतून सरकारला 14 लाख रुपयांचा महसूलही मिळाला आहे.
या नंबर प्लेटची संपूर्ण लिलाव रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे. वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा राज्यातील दुचाकींसाठी जारी केलेला सर्वात महागडा नोंदणी क्रमांक असू शकतो.
खूप झाले इलेक्ट्रिक कार, बाईक, स्कूटर ! आता मार्केटमध्ये Electric Auto, मिळणार 200 KM ची रेंज
संजीव कुमारच्या मते, त्यांना एक अनोखा आणि खास नंबर ठेवायची खूप आवड आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की छंदांना काही किंमत नसते. यासोबतच संजीव यांच्या मुलाने सांगितले की आम्ही नंबरसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. आणखी एक व्यक्ती देखील शर्यतीत होती, परंतु आम्ही सर्वात जास्त बोली लावून हा नंबर मिळवला आहे.